Join WhatsApp group

Ads

अकोला एमआयडीसीतबनावट गुटखा कंपनी वर कारवाई पंचनामा सुरू, आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरच

By Sarkar Maza

July 16, 2026 3:22 pm

Ads

अकोला | प्रतिनिधी

अकोला एमआयडीसी परिसरातील महाकाया ग्रीन एनर्जी प्रा. लि., प्लॉट क्र. ए.एन.-७१ येथे सुरू असलेल्या कथित बनावट गुटखा निर्मिती व पॅकेजिंग रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा भांडाफोड केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात विविध नामांकित कंपन्यांच्या ब्रँडचे रॅपर, लेबल, पॅकिंग साहित्य, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.एफडीएला काही दिवसांपासून एमआयडीसी परिसरात बनावट गुटखा तयार करून प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने बाजारात विक्री होत असल्याची माहिती मिळत होती. त्यानुसार नियोजनबद्ध कारवाई करत अधिकाऱ्यांनी गोदामावर छापा टाकला.

या कारवाईत मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग रोल, लेबल, तयार व अर्धवट तयार साहित्य आणि उत्पादनासाठी वापरले जाणारे कच्चे साहित्य आढळून आले.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात गौरव शर्मा याच्यासह आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तपास यंत्रणा या रॅकेटचे जाळे अकोला जिल्ह्याबाहेर इतर जिल्ह्यांपर्यंत पसरले होते का, तसेच या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही सखोल तपास करत आहे.

राज्य शासनाने आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी दिल्यानंतर भेसळयुक्त व बनावट खाद्यपदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक वेग आला आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्यभर सातत्याने धाडी टाकल्या जात असून, या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) किंवा इतर कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या शक्यतेचाही तपास यंत्रणांकडून विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय तपास पूर्ण झाल्यानंतर आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीनंतरच होणार आहे.टीप: वरील वृत्त उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आले आहे. गुन्हा नोंद होणे, आरोपींवरील कलमे किंवा MCOCA लागू होणे याबाबत अधिकृत पुष्टी संबंधित तपास यंत्रणेकडून झाल्यानंतरच अंतिम मानले जाईल.

“एफडीएचे अधिकारी घटनास्थळी पंचनामा व जप्तीची कार्यवाही करत असून, पुरावे संकलित केल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.”

Related Article

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

अकोला एमआयडीसीतबनावट गुटखा कंपनी वर कारवाई पंचनामा सुरू, आरोपींवर कायदेशीर कारवाई लवकरच

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी*शिवसेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन*

“मुर्तिजापूर शहर पोलिसांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी; चोरीतील ₹72,300 चा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत”

कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अकोल्याचा मुद्दा गाजला; आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली

मुर्तिजापूरच्या FIR मधील ‘RP’ कोण? शहरात एकच खळबळ; अज्ञात पांढरपोषाचा शोध लागणार कधी?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!