Join WhatsApp group

Ads

पत्नी, मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

By Sarkarmzanews

September 22, 2026 7:58 pm

Ads

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; १४ साक्षीदारांच्या साक्षीनंतर दोष सिद्ध

अकोला२२ सप्टेंबर : पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी मनीष किसनराव म्हात्रे (३५) याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

न्यायालयाने त्याच्यावर १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.पोलिसांच्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान देशमुख फैल येथील संतोषी माता मंदिराजवळील हनुमान बस्ती परिसरात ही घटना घडली.

आरोपीने त्याच्या दोन चुलत भावांसह रामदासपेठ पोलीस ठाण्यात येऊन पत्नी आणि मुलीवर कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घरात रश्मी मनीष म्हात्रे (३०) आणि त्यांची मुलगी माही मनीष म्हात्रे (९) मृतावस्थेत आढळून आल्या. घटनास्थळी रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणि लोखंडी सुरी आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी आणि त्याची पत्नी कौटुंबिक कारणांमुळे काही वर्षांपासून विभक्त राहत होते.

आरोपीला पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६९/२०२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मंगेश मानकर यांनी बाजू मांडली.

न्यायालया समोर एकूण १४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी आणि अन्य साक्षीदारांची साक्ष प्रकरणाच्या सुनावणीत महत्त्वाची ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रकरणाच्या न्यायालयीन पाठपुराव्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सुनिल दिपकवार तसेच सीएमएस सेलचे पोलीस हवालदार अजय वानखडे यांनी पाठपुरावा केला.

न्यायालयीन प्रक्रियेतील पुढील टप्पा महत्त्वाचाजिल्हा व सत्र न्यायालयाने दोषसिद्धीनंतर फाशीची शिक्षा सुनावली असली तरी, अशा शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित उच्च न्यायालयाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. त्यामुळे या निकालानंतरच्या पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडेही लक्ष राहणार आहे.

NEWS PHOTO – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!