Join WhatsApp group

Ads

हो मी स्वतः माझ्या पत्नीचा खून केला’ म्हणत आरोपी हजर

By Sarkar Maza

April 25, 2026 10:20 pm

Ads

मुर्तिजापूर (जि. अकोला) – मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका तरुणाने स्वतःहून हजर राहून खून केल्याची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी एक इसम पोलीस ठाण्यात आला. चौकशीदरम्यान त्याने स्पष्टपणे सांगितले की, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी बैतूल (मध्य प्रदेश) येथील मीना डॅम परिसरात स्वतःच्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर मृतदेह पाण्यात फेकून तो घटनास्थळावरून फरार झाल्याची कबुली त्याने स्वतः दिली.

सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर बैतूल बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२४/२६, कलम १०३(२) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. आरोपी मुंग्या कन्हैयाल जावरकर (वय अंदाजे २५ वर्षे, रा. जल्लार, जि. बैतूल, मध्य प्रदेश) हा त्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांच्या पथकाने आरोपीला तात्काळ ताब्यात घेत सुरक्षित ठेवले.त्यानंतर

त्यानंतर बैतूल बाजार (मध्य प्रदेश) येथील पोलिस पथक मुर्तिजापूर येथे दाखल झाल्यानंतर आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास बैतूल बाजार पोलिसांकडून सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!