Join WhatsApp group

Ads

सिडकोत एसीबीचा मोठा दणका:२२.५ टक्के योजनेच्या मंजुरीसाठी लाच घेताना अप्पर जिल्हाधिकाऱ्यासह शिपाई रंगेहात अटक!

By Sarkar Maza

May 14, 2026 9:42 am

Ads

नवी मुंबई प्रतिनिधी(श्रीनाथ दत्तात्रेय लाड):- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सिडको कार्यालयात एक मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (वय ५७) आणि शिपाई हरेश सोनवणे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली.

सिडकोच्या २२.५% विस्तारित योजने अंतर्गत एका रजिस्ट्रेशनचे काम प्रलंबित होते.हे काम करून देण्यासाठी २२,५०० रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.मूळपद अप्पर जिल्हाधिकारी असलेल्या रामदास जगताप यांनी ही लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने सिडको कार्यालयात सापळा रचला.मुख्य भूमी अधिकारी जगताप यांच्या सूचनेनुसार शिपाई हरेश सोनवणे (वर्ग-४) याने लाचेची रक्कम स्वीकारली.पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.

पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण झाली.नवी मुंबई एसीबी युनिट (ACB Unit) या प्रकरणी पुढील कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहे.

सिडको सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणात थेट अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!