Join WhatsApp group

Ads

अभिनव मोहोडची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.

By Sarkarmzanews

January 31, 2026 9:02 pm

Ads

कुरणखेड – दिनांक ३१ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा आयोजीत विभागीय स्तरीय पॉवरलिफ्टींग शालेय स्पर्धा मलकापुर बुलडाणा येथे दि. २७/०१/२०२६ रोजी पार पडल्या.

या स्पर्धेत व्यंकटेश बालाजी हायस्कुल मुर्तिजापुर येथे शिकत असलेला अभिनव सुशिल मोहोड वर्ग १० वी मध्ये शिकत असून त्यांची ५३ किलो वजन गटामध्ये अमरावती विभागातुन २५५ कि.ग्रॅम वजन उचलुन सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तो मुळ कुरणखेड येथील रहिवाशी असुन माजी सैनिक अभिमान व्यायाम शाळा येथे सराव करतो.

या खेळाडूचे राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धा ३ ते ४ फेब्रुवारी सातारा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

त्याचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनव मोहोड यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री अवधुत ढेरे सर, प्राचार्य सारीका कडु, क्रीडा शिक्षक निलेश उंबरकर सर व पालकांना दिले आहे.

 

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!