Join WhatsApp group

Ads

भक्तीच्या वाटेवर सेवाभावाची साथ; हर्षद दादा अग्रवाल मित्र परिवार सक्रिय

By Sarkarmzanews

September 8, 2026 5:36 pm

Ads

मूर्तिजापूर : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी लाखपुरी येथील लक्षेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीतून घेऊन सुमारे १५ किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या हजारो शिवभक्तांनी मूर्तिजापूर शहरात प्रवेश केला. ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. या कावड यात्रेदरम्यान हर्षद दादा अग्रवाल मित्र परिवाराने शिवभक्तांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली.

कावडधारकांचा लांब पल्ल्याचा पायी प्रवास लक्षात घेता मित्र परिवाराच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सेवा व सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले. उन्हाचा कडाका असतानाही खांद्यावर कावड घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या शिवभक्तांना सेवा देण्याचा उपक्रम मित्र परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे राबविला.

हर्षद दादा अग्रवाल मित्र परिवाराच्या माध्यमातून धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना मदत करण्यासोबतच उत्सवाचे शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन व्हावे, यासाठीही परिवारातील सदस्यांनी सहभाग नोंदविला.

या उपक्रमात सतीश अग्रवाल, अंकित अग्रवाल, विशाल अग्रवाल, उज्ज्वल अग्रवाल, नितेश अग्रवाल, अनूप अग्रवाल, अविन अग्रवाल, अंकुश अग्रवाल, सुमित वर्मा, संजय अग्रवाल, संजय मोजिका, गजानन तायडे, लीलेश मुळे, अभिनव मुळे, पवन ठवले, मनोज, धीरज तलोकर, दिलीप गोसावी, सार्थक, पवन यांच्यासह मित्र परिवारातील सदस्य सहभागी झाले.

दरम्यान, कावड यात्रेच्या निमित्ताने मूर्तिजापूर शहरातील सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचेही दर्शन घडले. मुस्लिम समाजातील प्रमुख नेते, पदाधिकारी व नागरिकांनी ठिकठिकाणी कावडधारकांचे स्वागत करून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.

oplus_0

कावड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिस विभागाकडूनही विशेष खबरदारी घेण्यात आली. विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आमदार हरीश पिंपळे,नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार धर्मेश जोशी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार दीपक महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते.

श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत हर्षद दादा अग्रवाल मित्र परिवाराचा सहभाग कावड यात्रेतील लक्षवेधी उपक्रम ठरला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!