Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधींचा धक्का; १.७५ कोटींची फसवणूक करून व्यापारी फरार?

By Sarkar Maza

February 22, 2026 6:15 pm

Ads

मुर्तिजापूर (दिनांक 22):मुर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. अ वर्ग खरेदीदाराचा परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्या सालासार ट्रेडर्सशी संबंधित सौ. अलका सुनील अग्रवाल, सुनील ब्रिजमोहन अग्रवाल व सुनील अग्रवाल (रा. शाकंबरी चौक, मुर्तिजापूर) यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, संबंधितांनी मागील तीन महिन्यांत अडत्यांमार्फत सुमारे ८४२८.६६ क्विंटल सोयाबीन खरेदी केली. खरेदी वेळी “२० फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम अदा करू” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मुदत उलटल्यानंतर रक्कम न भरता संबंधितांचे मोबाईल बंद आढळले तसेच निवासस्थानही रिकामे असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणात शेतकरी, अडते, बाजार समिती व शासन यांची मिळून सुमारे १.७५ कोटी रुपयांची देणी थकीत असल्याचा आरोप आहे. तसेच बाजार समितीची सुमारे ९.१९ लाख रुपयांची बाजार फी व देखरेख शुल्क न भरल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!