Join WhatsApp group

Ads

-

माणुसकीचे दर्शन! विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक यांची धाव

By Sarkar Maza

June 26, 2026 12:09 pm

Ads

मूर्तिजापूर : शहरातील चिखली गेट परिसरात घराचे बांधकाम सुरू असताना विजेचा जोरदार शॉक लागून एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक यांनी प्रसंगावधान दाखवत जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश आकाराम पेंडोरे (रा. सालतवाडा) हा युवक चिखली गेट परिसरात बांधकामाचे काम करीत असताना त्याला उच्चदाबाच्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागला. शॉक इतका तीव्र होता की, तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला व गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच संजय नाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही वेळ न दवडता जखमी आकाश पेंडोरे याला स्वतःच्या वाहनातून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे दाखल केले. सकाळच्या वेळेत शहरात वाहतूक कोंडी असतानाही त्यांनी सतत हॉर्न वाजवत रुग्णवाहिकेसारखा मार्ग काढत युवकाला वेळेत रुग्णालयात पोहोचविले.

रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे तसेच डॉ. रेहान चाऊस यांनी तातडीने उपचार सुरू केले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे युवकाचे प्राण वाचविण्यात यश आल्याची माहिती देण्यात आली. सध्या आकाश पेंडोरे याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

संकटकाळात तत्परता दाखवत माणुसकीचा धर्म जपणाऱ्या संजय नाईक यांच्या या कार्याचे शहरासह परिसरात सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Article

माणुसकीचे दर्शन! विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक यांची धाव

‘मुद्रांक शुल्कात सवलतीचा सौदा महागला’; अकोल्यात जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

अकोला जिल्ह्यात मान्सूनचा दमदार धडाका; शेतकऱ्यांना दिलासा, काही भागात पिकांचे मोठे नुकसान

राज्य सरकारचे आश्वासन; शेतकऱ्यांना आता हक्काची मदत हवी! तर आमदार हरिष पिंपळे यांची अग्नी परीक्षा

नाशिकमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त ‘ऑलिम्पिक सप्ताह’चे आयोजन, 23 ते 30 जूनदरम्यान विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन

अकोला जिल्हा प्रशासनाचा राष्ट्रीय सन्मान; ‘ई-भूमिती’ला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार – जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना नवी दिल्लीत राष्ट्रीय सन्मान

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!