Join WhatsApp group

मुर्तिजापूरमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार पदाचा AB फॉर्म कोणाचा? जनतेत वाढली राजकीय उत्कंठा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : १३ नोव्हें.२५ : नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मुर्तिजापूर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी मिळणार, याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

पक्षातील दोन ते तीन दावेदारांनी आपापल्या पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सचिन देशमुख आणि हर्षल साबळे या नावांची चर्चाचर्चा सध्या शहरातील प्रत्येक गल्लीत सुरू आहे. दोन्ही नेते तरुण, कार्यक्षम आणि प्रभावी असल्याने पक्षातील निर्णय अधिक कठीण झाला आहे. पण वेळेवर कोणता नवीन उमेदवार पक्ष घोषित करणार का?

दरम्यान, भाजपच्या गटांत सतत बैठका, चर्चा आणि रणनीतीचे फेरे सुरू आहेत. जिल्हा स्तरावरील नेते आगामी दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शहरातील मतदार मात्र प्रचंड संभ्रमात आहेत — “भाजपकडून अखेर कोण मैदानात उतरणार?” या प्रश्नाने कार्यकर्ते आणि समर्थकापेक्षा जनतेमध्ये मानसिक ताण–तणाव निर्माण झाला आहे.

काही कार्यकर्ते स्वतःच्या नेत्यासाठी गुप्त पातळीवर प्रचाराची तयारी करत आहेत, तर काही जण पक्षाच्या आदेशाची वाट पाहत शांत आहेत.

दरम्यान, इतर राजकीय पक्ष या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करत असून, भाजपचा उमेदवार ठरल्यानंतरच पुढील रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत.

🗳️ मुर्तिजापूरमध्ये भाजपचा उमेदवार जाहीर होताच निवडणूक रंगणार तीव्र.

सध्या शहरात फक्त एकच चर्चा: “कमळ कोणाच्या अंगणात उमलणार?”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!