Join WhatsApp group

कुरणखेड पंचायत समिती सर्वसाधारण साठी राखीव, युवा चेहऱ्यांच्या उमेदवारीची चर्चा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : कोणता पक्ष देणार युवा चेहऱ्याला संधी कुरणखेड – नुकतच काही दिवसा अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आहे यामध्ये कुरणखेड पंचायत समितीचे आरक्षण सर्व साधारण निघाल्याने अनेक समाजातील युवकांनी या जागेसाठी आपला दावा ठोकला आहे.

त्यामुळे कोणता पक्ष युवा चेहर्याला संधी देतो याकडे लक्ष लागले आहे कुरणखेड जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येत असलेल्या पंचायत समितीचे सर्व साधारण आरक्षण निघाले असून या जागेसाठी अनेक युवा चेहर्यांनी आपला दावा ठोकला आहे.

अनेक वेळा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या जागेवरून निवडून गेला आहे मात्र मागील पंचवार्षिक मध्ये अनेक रेकॉर्ड तोडत भारतीय जनता पार्टीच्या सुषमा प्रशांत ठाकरे यांनी या गडाला सुरुंग लावत येथे विजय मिळवला होता त्यांची कारकीर्द चांगली राहली .

त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार तायरा बी, त्याचबरोबर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता मात्र यावेळेस समीकरण बदलले असून ही जागा सर्व साधारण साठी राखीव असल्यामुळे या जागेसाठी अनेक पक्षातील युवा तरुण चेहऱ्यांनी आपला दावा ठोकला आहे.

यामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव माजी पंचायत समिती सदस्या सुषमा प्रशांत ठाकरे सुद्धा इच्छुक आहेत त्याचबरोबर कुरणखेड ग्रामपंचायत सदस्य भाजपा तालुका सचिव अमन महल्ले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव असलेले सुयोग देशमुख, हे सर्व युवा तरुण चहरे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या परिसरामध्ये सुरू आहे.

यांना संधी दिल्यास विकास कामे घडणार असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी कडून युवा चेहरा म्हणून, युवा सामाजिक कार्यकर्ता मिलिंद भिमराव मोहोड,तंटामुक्ती अध्यक्ष जशीमुद्दीन खतीब, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष शेख जमील पक्षाचे निष्ठावान असलेले शेख रसुल हे सुद्धा यासाठी दावेदार आहे त्याबरोबर सेना राष्ट्रवादी काँग्रेस कडून युवा चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या जागेसाठी हे युवा चेहरे म्हणून दावेदार आहेत त्यामुळे आता कोणता पक्ष युवा चेहर्याला संधी देतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी – योगेश विजयकर


Share

Leave a Comment

error: Content is protected !!