Join WhatsApp group

एमपीएससी परीक्षांतील पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी – आमदार रणधीर सावरकर यांची मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

१ जुलै २५ अकोला : राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या अराजपत्रित गट-ब व गट-क परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही अद्याप नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवण्यात आला आहे.

आमदार रणधीर सावरकर यांनी या विषयावर तारांकित प्रश्न क्रमांक ७१०३ उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेतील निवड झालेल्या अनेक उमेदवारांना अद्यापही नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत, त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे.

या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की—

  • लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी आयोगाने अद्याप अंतिम निवड यादी जाहीर केलेली नाही.
    • २७८ नियुक्ती प्राधिकाऱ्यांनुसार तात्पुरती निवड यादी १६ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात आली.
    • यामध्ये ६६०० उमेदवार शिफारसपात्र ठरले आहेत.
    • Opting Out चा पर्याय दिल्यानंतर ६७१ उमेदवारांनी नोकरीस नकार दिला.
    • अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • कर सहायक पदासाठी:
    • ४६८ पदांपैकी ४६५ उमेदवारांची शिफारस मार्च २०२५ मध्ये वित्त विभागास केली.
    • त्यापैकी १८५ उमेदवारांना मे २०२५ मध्ये नियुक्ती आदेश दिले गेले.
    • उर्वरित उमेदवारांच्या प्रमाणपत्र पडताळणीचे अहवाल आल्यानंतर त्यांनाही नियुक्ती दिली जाणार.
  • दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क):
    • ६ पदांपैकी ३ उमेदवारांना आधीच नियुक्ती दिली.
    • उर्वरित ३ उमेदवारांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
  • तांत्रिक सहाय्यक संवर्गासाठी:
    • एका उमेदवाराची ११ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्ती केली गेली आहे.

Share

Leave a Comment

error: Content is protected !!