Join WhatsApp group

अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कडून अभिवचन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक : 13 : अकोला : अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विकास पुरुष दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी पातुर शेगाव या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच अकोला ते महान रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा व त्यासाठी प्रस्ताव तसेच अकोला रेल्वे स्थानकाचा नवीन रेल्वे पूल निर्माण साठी निधी उपलब्ध करून देण्याचा अभिवचन दिला.

त्या संदर्भात ते प्रस्ताव मागितले त्याबद्दल अकोला लोकसभा जनतेच्या वतीने खासदार अनुप धोत्रे आभार व्यक्त करून विकास कार्यात जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असल्याबद्दल व सतत असाच प्रेम आशीर्वाद राहावा यासाठी सदिच्छा भेट घेऊन अनेक प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली.
खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन अनेक विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याबद्दल व विकास कामाला गती दिल्याबद्दल तसेच लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळी घातले त्यासंदर्भात आमदार गडकरी यांनी निधी उपलब्ध करून देऊ असे अभिवचन दिले.

तसेच जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाला लोकसभा मतदारसंघातील प्रकल्पाला गती देण्या संदर्भातला अभ्यास सुरू असून गांधीग्राम निधी उपलब्ध केल्याबद्दल सुद्धा खासदार धोत्रे यांनी आभार व्यक्त केले तसेच महान अकोला पातुर शेगाव हा रस्त्याच्या चौपदरीकरण साठी निधी व प्रस्ताव मागितल्याबद्दल आमदार खासदार अनुप धोत्रे यांनी प्रस्तावना ताबडतोब मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी केली.

या संदर्भात सकारात्मक पावले उचलून पश्चिम विदर्भाच्या विकासाला आपण गती देऊ अशी अभिवचन नामदार गडकरी यांनी खासदार धोत्रे यांना दिले. यावेळी नामदार गडकरी यांनी लोकनेते माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!