दि. ०३ : मुर्तीजापुर : पीएमसी स्कूल स्व रामदास भैय्या दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आयएसओ मानांकन प्राप्त डिजिटल स्कूल मध्ये आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.
बालिका दिनाच्या औचित्य साधून रितिका गुल्हाने या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केली होती शाळेमध्ये आज रोजी मुलांचा उत्साह व मुलांना व्यवहार ज्ञान समजावे खरी कमाईचे ज्ञान व्हावे यासाठी शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी माननीय प्रशासन अधिकारी श्री सुभाष म्हैसणे , माजी नगराध्यक्ष मा.श्री द्वारकाप्रसादजी दुबे , अशोक भैया दुबे, कैलास भाऊ महाजन, अनिल अग्रवाल, प्रकाश श्रीवास, अजय प्रभे, विलास वनस्कर शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप झोडपे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल यादव शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य श्री विशाल अंबळकार , सौ अर्चना मोरे श्री लक्ष्मण बोंद्रे, किरण औंधकर श्री दीपक हांडे सौ अश्विनी अंबळकर सौ रक्षदा येवोकर सौ अस्वीता गुल्हाने श्रीमतीअनिताताई देवके सौ सुषमाताई बाळापुरे, खुशबू महाजन वरील सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते..


