बर्शिटाकळी : दिनांक २६ : शिक्षण महर्षी डाॅ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त श्री. शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजंदा येथे मंगळवार दिनांक 24 डिसेंबरला अमरावती विभागीय शालेय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड. गजाननराव पुंडकर होते, प्रमुख अतिथी म्हणुन,प्रा. अरविंद मंगळे,प्रकाश अंधारे, अकोला जिल्हा संघटनेचे सचिव सुभाष ठाकरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त श्रीराम निळे, यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हा संघाने सहभाग घेऊन चार संघ शालेय राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अविनाश बोर्डे यांनी केले विभागातील पाच जिल्ह्यामधुन वयोगट 14 वर्षे मुली
प्रथम क्रमांक शिवाजी हायस्कूल राजेंद्र जिल्हा अकोला, द्वितीय क्रमांक
भारतीय ज्ञानपीठ शाळा मेहकर जिल्हा बुलढाणा, मुलांमध्ये प्रथम क्रमांक सहकार विद्या मंदिर मोताळा जिल्हा बुलढाणा द्वितीय क्रमांक शिवाजी हायस्कूल राजंदा जिल्हा अकोला वयोगट 17 वर्ष मुले प्रथम क्रमांक सहकार विद्या मंदिर मोताळा जिल्हा बुलढाणा, द्वितीय क्रमांक शिवाजी हायस्कूल राजंदा जिल्हा अकोला.
मुलीमध्ये प्रथम क्रमांक राजमाता जिजाऊ मुलींची सैनिक शाळा चांदई जिल्हा बुलढाणा द्वितीय क्रमांक शिवाजी हायस्कूल राजंदा जिल्हा अकोला वयोगट 19 वर्ष मुले प्रथम क्रमांक स्वर्गीय बबनराव देशपांडे महाविद्यालय मोताळा जिल्हा बुलढाणा द्वितीय क्रमांक शिवाजी हायस्कूल राजंदा जिल्हा अकोला
मुलीमध्ये प्रथम क्रमांक शिवाजी हायस्कूल राजंदा जिल्हा अकोला द्वितीय क्रमांक राजमाता जिजाऊ सैनिक शाळा चांधई जिल्हा बुलढाणा
पाचही जिल्ह्यातील संघांमधून बुलढाणा व अकोला जिल्ह्याने यामध्ये वर्चस्व राखले कार्यक्रमाचे संचालन विजय ढूके यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सुनील बैस यांनी केले.
बुलढाणा जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक सचिव श्रीराम निळे, कोषाध्यक्ष योगेश शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकार, धारपवार , गणेश केळेकर, यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विजय खेळाडूंचे अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





