मूर्तिजापूर – दिनांक २३ : दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटने च्यावतीने संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे व शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कडे तहसीलदार मूर्तिजापूर यांच्या मार्फत पाठविले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कडे सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या तत्कालीन मंत्रीमंडळाने सर्वांसाठी घरे धोरण घोषित करून निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला.
त्याचं धर्तीवर पुन्हा देवेंद्र फडणविस बहुमताचे सरकार बनवून मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्या सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करुन शेतीचे अतिक्रमणे नियमानुकुल करणे करीता धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा अन्यथा सत्ताधारी पक्षाच्या आमदार यांच्या घरा समोर धिंगाणा आंदोलन करण्यात येईल यांची सरकारने खबरदारी घ्यावी असा इशारा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी निवेदनातून दिला असुन आंदोलनाची सुरवात मूर्तिजापूर मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरापासून करणार असल्याचं निवेदनात नमूद केले असुन एकता नगर येथील निवासी अतिक्रमण धारकांचे प्रस्ताव बोलावून पुढील कारवाई करण्याचे नमूद केले असुन त्याबाबत भिक्षूनी रत्नवली थेरी सहित डॉ सुखदेव कांबळे राहुल जामनिक, युवा नेते प्रवीण जमनिक वानखेडे उपस्थित होते.
