बर्शिटाकळी : ओम दाते दिनांक २० : अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे मोरळ येथील एका 21 वर्षे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे,
प्राप्त माहितीनुसार, पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे मोरळ येथील 21 वर्षे महिला सरकारी बोरिंगवर पाणी भरण्यासाठी गेली असता, त्या ठिकाणी गावातील दत्ता भीमराव जोंधळे हा त्या ठिकाणी फोनवर बोलत होता, सदर फिर्यादी महिला पाणी घेऊन घरी जात असताना, आरोपी दत्ता भीमराव जोंधळे याने सदर महिलेला मागून कवट्यात पकडले,
त्यामुळे सदर महिला घाबरली होती, आरोपीच्या हाताला झटका मारून सदर महिला भांडे घेऊन घरी परत गेली, महिला या प्रकरणाची माहिती आपल्या पतीला फोनवर सांगत असतानाच आरोपी हा सदर महिलेच्या घरात घुसला, आणि पाठीमागून पुन्हा कवट्यात पकडून वाईट उद्देशाने बेडरूम मध्ये नेण्याचा प्रयत्न केला ,
तेव्हा फिर्यादीने आरडा ओरड करून दीड वर्षाची मुलगी तिच्या घरच्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर निघाली, त्यावेळी आरडाओरड केल्यामुळे सदर आरोपी हा पीडित महिलेच्याघरातून पळून गेला, यावेळी आरोपीने पीडित महिलेला हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या नवऱ्याला खतम करून टाकील, अशी धमकी दिली,
अशी फिर्याद पिंजर पोलिसात दाखल होताच, पोलिसांनी तपास करत आरोपी दत्ता भीमराव जोंधळे याचे विरुद्ध कलम 74, 75 ,78 ,333, 351 (१) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे, सुमेध मोहोड या दाखल अधिकाऱ्याने गुन्हा नोंदवून घेतला, या प्रकरणाचा तपास पिंजरचे थानेदार गंगाधर दराडे ,पीएसआय गजानन रहाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नामदेव मोरे हे अधिक तपास करीत आहेत, सदर घटना 17 डिसेंबर रोजी मोरळ येथे घडली आहे.
