Join Whatsapp

उमेदवारांनी सुरु केले मनोवैज्ञानीक पध्दतीने प्रचार

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – निवडणूक जवळ आली प्रचाराला सुरवात झाली फलक लागले, भोंगे फिरत आहे,ग्रामीण विभागात जाऊन कॉर्नर सभा सुरु आहेत तर कुठे मोठ्या नेत्यांची सभा आयोजित होत आहे. कोणी उमेदवार आपल्या पाठी मागे कार्यकर्ते घेऊन फिरत आहे तर कोणी भाड्याने माणस आणून आपला प्रचार करत आहे, कोणी आपल्या पक्षाचे चिन्ह वाटप करत आहे. जाहीरनामे, पक्षाचे बिल्ले, सोशल मिडिया असे अनेक प्रयोग व साहित्य प्रचारासाठी निवडणुकीत वापरले जाता आहे.

पण या पुढे पण एक प्रचार असतो तो कोणाचा लवकर लक्षत येत नाही तो म्हणजे मनोवैज्ञानीक प्रचार आता हे नवीन काय आहे, आपल्याला वाटत असेल तर हे नवीन नसून याची चर्चा कुठेच होत नाही निवडणुकीचा वेळेस कोणी तरी समाजसेवक, नगरसेवक, आपल्या जातीचे माठे नेते किंवा आपल्या ओळखितले वरिष्ठ असे कोणी तरी आपल्या घरी येऊन आपल्याला त्यांनी सुपारी घेतलेल्या किंवा त्या पक्षात असलेले सक्रिय कार्यकरते असतात व आपल्याच घरचा चहा पाणी घेऊन तसेच आपल्या पर्यंत ज्या सुविधा पोहचत नाही, जे आपल्या समस्या आहेत, पारिवारिक बोलचाल करून त्या उमेदवारा बद्दल आपले माईंड सेट करतात किंवा अफवा पसरवितात.

तसेच आपल्या युवक पाल्यांना दिवसभर प्रचारासाठी सोबत फिरवतात संध्याकाळी दारू,मासाहार जेवण खाऊ घालून त्यांचा पण डोक्यात अमुख उमेदवाराची हवा भरतात. चहाचा टपरीवर. पानटपरी वर सुद्धा हाच प्रयोग दिवसभर चालतो, अनेक सुज्ञ लोक सुद्धा याला बळी पडतात, त्यांना सुद्धा हा जाळ समजत नाही. घरी आल्यावर तो घरचा लोकांना पण अमुख उमेदवार पुढे चालत आहे अशा चर्चा घरात येऊन करतो.

त्यानंतर पेड बातम्याच आधार घेऊन, सोशल मिडियाच्या माध्यमातून, आपल्या डोक्यावर प्रचाराचा हातोडा मारला जातो.

काही उमेदवार मीच निवडून येणारच अशा शब्दात आपला अति आत्मविश्वास जनतेला दाखवितात, तसेच लाडका भाऊ लाडकी बहिण, बचेंगे तो लडेंगे, अपना गडी , अमुख साहेबाचा वारसा, जय हरी, असे अनेक ब्रीदवाक्य वापरून आपल्या मानसिकतेला बदलण्याचे प्रयत्न पण या निवडणुकीत होत आहे. जातीवाद वर न लिहिलेलं बर कारण जाती सोबत माती खाण्याचा अभिमान प्रत्येकालाच.

कोणाचा सांगण्यावरून किवा जातीपातीचा राजकारणाला बळी न पडता, कोणाची हवा आहे हे न पाहता , कोणता समाज कुठे जातो आहे हे डोक्यात न ठेवता, आप आपल्या सूळ बुद्धीने मतदान करावे न उमेदवारांनी सुरु केले मनोवैज्ञानीक पध्दतीने.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!