Join WhatsApp group

पैशाच्या जोरावर समाजसेवा ते उमेदवार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा- ३१ ऑक्ट.२४- मुर्तिजापूर बार्शीटाकळी मतदार संघ 32 मध्ये कोणता हा पावरफुल नेता नसून फक्त या मतदारसंघात जातीचा राजकारण चालत असतो, अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे येथे प्रत्येक वेळेस अर्ध हिंदू अनुसूचित जमातीचे विधानसभेला लोकप्रतिनिधी आहे.

जाती व समाजाच्या राजकारणामुळे येथे कुठला नवीन चेहरा निवडून येत नाही याचा फायदा घेत, आपली किस्मत आजमावण्यासाठी दरवर्षी भाजप सोडून दुसऱ्या पक्षाचे नवनवीन उमेदवार या मतदारसंघात दिले जातात.

आता हे पॅरॅशूट उमेदवार निवडणुकीच्या एक वर्षा अगोदर येऊ बाहेरचे दोन नंबरचे पैसे या मतदारसंघात अमाप खर्च करून स्वतःला समाजसेवक दाखवण्याचा ढोंग करतात.

हे कोण आहे? हे कुठून आले आहे? जनतेला काही समजत नाही, फक्त काही कार्यक्रम घेऊन थोडीफार गरिबांची मदत करून हे नेते विशिष्ट समाजाच्या जातीच्या आधारे मतदार संघात निवडणूक जिंकण्याचे स्वप्न बघतात.

कुठल्याही एका पक्षाला धरून त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून पैशाचा जोरावर जसे पाहिजे तसे फतवे जाहीर करायला सांगतात, व त्या राजकीय फतव्यांना बळी पडून कार्यकर्त्यांना अशा ढोंगी समाजसेवकाचे उमेदवाराचे काम करावे लागते.

स्थानिक पातळीच नेते पण पक्षामध्ये अहोरात्र मेहनत करून उमेदवारीचे स्वप्न बघतात पण पॅराशुट उमेदवार पैशाच्या भरोशावर या नेत्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतो.

स्थानिक नेते पक्षाच्या दबावाला बळी पडून त्या उमेदवारासाठी न काम करण्याची इच्छा असूनही त्यांना मजबुरीने या ढोंगी समाज सेवकाचे काम करावे लागते मग तोच ढोंगी समाजसेवक उमेदवार बनतो.

आपलं भवितव्या पक्षामध्ये टिकून राहावं कारण की पक्षामुळे माझी ओळख आहे, अशा राजकीय गोष्टींना स्थानिक नेते बळी पडतात.

राजकीय स्वार्थासाठी आपला स्वाभिमान गहाण ठेवून ढोंगी समाजसेवक जे आज उमेदवार बनले आहे त्यांचा काम करण्यासाठी मजबूर होतात.

अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!