Join Whatsapp

घर की मुर्गी दाल बराबर……

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – एक संधीसाधू संपूर्ण मासाहारी ड्रायवर आहे तो पगार न घेता साहेबाची गाडी चालवतो व फुल्ल ड्युटी इमानदारीने साहेबांना देतो. एक दिवस दोघे गेले मुंबईला नंतर आज घरची दाल सोडून बिर्याणी खायची इच्छा साहेबाची झाली पण मुंबई खूप मोठी असून साहेब एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे तर बिर्याणी खायला साहेबांना हॉटेलमध्ये जाणे शक्य नव्हते कारण की साहेब दुनियासमोर शाकाहारी होण्याचे सोंग करतात .

त्यांनी आपल्या ड्रायव्हरला सांगून हॉटेलवर बिर्याणीची सोय करून द्यायला सांगितली, ड्रायव्हरने बाजारातून चांगल्या क्वालिटीची बिर्याणी आणून साहेबांना खाऊ घातली, बिर्याणीची टेस्ट चांगली असल्यामुळे साहेब ड्रायव्हर वरती खूप खुश झाले नंतर कधी पण बिर्याणी खायची इच्छा झाली तर ड्रायव्हरला सांगायचे, पण कोरोन काळ सुरु झाला गावाच्या बाहेर जाण्याचे काम नसून नंतर काही दिवस मुंबईला चक्कर न झाल्यामुळे बिर्याणी खायला ड्रायव्हरला सोबत घेऊन साहेब जवळच्या गावात गेले व तिथे ड्रायव्हरला मित्राचा फार्म हाउस वर बिर्याणीची सोय करायला सांगितली .

पण त्या गावात चांगली बिर्याणी मिळत नसल्याने ड्रायव्हरने खूप सुंदर कोंबडी आणली साहेबांना म्हटले, बिर्याणी तर आपण प्रत्येक वेळेस खातो आज आपण कोंबडीला कापून चिकन बनवून खाऊ. पण कोंबडी खूप सुंदर व मादक दिसत असल्यामुळे साहेबाची इच्छा त्या कोंबडीला कापण्याची नाहीशी झाली.

कारण कोरोणा काळात रोज वेगवेगळे असे मांसाहार पदार्थ भेटणे अशक्य होते कोंबळी रोज अंडा देईल तोच अंडा खाऊन आपली तात्पुरती मनाची शांती करू व अंडा खाल्ल्याने आपल्या शरीराला दररोज प्रोटीन मिळेल त्यामधून डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे आपली रोगप्रतिकारक क्षमताही वाढेल व शरीराला व मनाला तसेच पोटाला सुख मिळेल, असे साहेबांना वाटले.

मग साहेबांनी त्या कोंबडीला त्याच गावात ठेवून तिला दाणापाणी सुरू केला व एकाच कोंबडीसाठी एक पोल्ट्री फार्म बनवले त्या पोल्ट्री फार्ममध्ये सगळ्या सोयी सुविधा कोंबडीसाठी उपलब्ध केल्या मग कोंबडी पासून साहेब जास्तच आकर्षित झाले होते पहिले आठवड्यातून एक चक्कर होत होता आता आठवड्यातून दोन-तीन चक्कर मारा याला साहेबांनी सुरुवात केली.

कोंबडी सोबत प्रेमसंबंध साहेबांचे खूपच घनिष्ठ झाले होते पण कोणत्याही गोष्टीपासून माणसाचे मन लवकर भरते तसेच या कोंबडी बद्दल पण झाले नंतर हळूहळू ही कोंबडी साहेबांना बोर व्हायला लागली मग त्या कोंबडीचा दाणा पाणी पण साहेबांनी कमी केला पण तेव्हापर्यंत कोंबडीची लालच वाढली होती कोंबडी आता पोल्ट्री फार्म सोडून दुसऱ्या कुठल्याच जागेवर राहण्यास तयार नव्हती.

मग ती कोंबडी साहेबांना रोज फोन करत होती पण साहेब काही फोन उचलत नव्हते आठवडा गेला, महिना गेला, साहेब फोनच उचलत नाही कदाचित साहेबांनी मला खोटे आश्वासन देऊन माझी फसवणूक तर केली नाही ना ? मी कदाचित वयस्कर झाल्यामुळे माझे वजन कमी झाल्यामुळे तर साहेब माझा पासून दुरावत तर नसेल ना असे अनेक प्रश्न कोंबडीच्या मनात येत होते.

कोंबडी हुशार कोंबडी एक दिवस साहेबाच्या घरी आली तिने घरच्या डाळीबरोबर आपली ओळख न दाखवता सेल्फी काढली व सेल्फी साहेबांच्या मोबाईलवर पाठवली हे पाहून साहेबाची पायाखालची जमीन घसरली कोंबडी त्यादिवशी साहेबाच्या गावातच होती पण कोंबडी फोन उचलत नव्हती त्या कोंबडीची शोधा शोध सुरू झाली व कसाई लोकांना पण बोलावण्यात आले आज जर कोंबडी भेटली, कोंबडीचा गेम करून द्यायचा पण डावपेच कोंबडीला पण जमत होते. कोंबडीने बरोबर एक हुशार माणसोबत संगनमत करून मांडवली केली

आयुष्याला जेवढा दाणापाणी पुरेल तेवढा दाणापाणी एकच वेळेस ट्रक भरून कोंबडी घेऊन उडाली नंतर जाताना साहेबांसोबत चे व्हिडिओ फोटो साहेबाच्या विरोधी माणसाला देऊन गेली जर माझ्याबरोबर भविष्यात काही बरे वाईट झालं तर हे काही पुरावे तुमच्याजवळ असू द्या एवढं सांगून कोंबडी उडाली परत कधी साहेबांच गावात दिसली नाही.

तो ड्रायवर जो आज हि वेगवेगळे मासाहारी पदार्थ साहेबांना खाऊ घालतो तो आज साहेबांचा आशीर्वादाने त्याने खूप पैसा कमविला आहे. पण त्याची लायकी ड्रायवरचिच आहे. कारण ड्रायवर राहण्यात खूप फायदा आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!