न्यूज डेस्क – २० ऑक्टो. २४ – आज दुपारी ४ वाजता दरम्यान कुणाल अमोल खांडेकर हा आपल्या मित्रान सोबत सुट्टी असल्याने खादानावर पोहण्यासाठी गेला असता. तेथे पाण्यात बुडून त्याचा जागीच मृत्यू झाला , कुणाल अमोल खांडेकर वय – १४ वर्ष राहणार भगोरा तालुका मुर्तीजापुर भाऊ साहेब बिडकर अंनभोरा येथे इय्य्ता ८ वर्गात शिकत होता. त्याला सध्या पोस्टमार्टम साठी लक्ष्मिबाई देशमुख रुग्णालयात ठेवले आह.
सदर खदान हि शासकिय वनीकरणाचा जागेत असून अंदाजे १ ते २ एक्कर मध्ये २० फुट खोल खोदली असून एका ठेकेदाराणे या मधून मुरूम उत्खनन केले आहे, आता हे उत्खनन करताना या मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप संतप्त गावकरी करत आहे, आता याचा नेमका ठेकेडत कोण ? याची अद्याप माहिती मिळाली नसून हा बहाद्दुर कोण आहे हे बघणे गरजेचे आहे.
प्रशासनाचा नियमाप्रमाणे जर जेवढ्या जागेवर उत्खनन होत असेल तर तेवढ्या जागेला भींतीचे आवार असणे गरजेचे आहे, रात्री जर गावकऱ्यांचा येण्या जाण्याचा मार्ग असेल तर लाल रंगाचा लाईट असणे त्या जागेवर अनिवार्य आहे. तसेच अश्या क्षेत्रात काही जीवित हानी झाली तर याचे जबाबदार संबधित कंपनी किवा तो ठेकेदार असते.
आज पर्यंत अनभोरा भगोरा या गावाचा जवळ पास अनेक खदानी असून त्या मध्ये अनेक मुके जनावर व माणसांची जीवित हानी नेहमी होत असते नियमांना धाब्यावर बसून प्रशासन व ठेकेदार अजून किती बळी घेईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
