Join WhatsApp group

मुर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार सिमिती चा भोंगळ कारभार शेती मालाची लूट केव्हा थांबेल?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – १६ ऑक्ट.२४- मूर्तिजापूर शहर येथे शेतकरी संघटना आक्रमक झाली. दिनांक 15-10-2024 ला मूर्तिजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीला सोयाबीनचे भाव ३००० ते ३५०० रुपये हर्राशी बोली केल्या जात होती. जेव्हा की सोयाबीन चे हमी भाव अंदाजे ४८०० रु. आहे.

हे सर्व घडत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य व अधिकारी झोपले आहे का ? की दलाल लॉबी वर त्यांचे काही वचक राहिले नाही? की दलालान सोबत यांची काय साठ गाट आहे?

हर्राशी सुरू असताना हे चित्र बघून तिथल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू वाहत असतांना दिसले. दिवाळी तोंडावर असून काही चोर लॉबी मुळे शेतकऱ्याला वेठीस धरण्याचे काम उघड पने कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुरू आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच शेतकरी नेते श्री शरद सरोदे यांनी शेतकरी संघटनेचे नेते श्री सुरेश भाऊ जोगळे व श्री अरविंद भाऊ तायडे यांना फोन करून कृषिउत्पन्न बाजार समितीत बोलावून घेतले असता शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेताच व्यापाऱ्यांनी सदर सोयाबीनचा योग्य भाव देऊन काटा करून घेतला

तसेच शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे आभार मानले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!