Join Whatsapp

शरद पवार गटाच्या पक्षातले कथित जेष्ठ नेते येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या तिकीटासाठी प्रयंत्न करतील का?

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापुर – १५ ऑक्टोबर २४ – आज पासून आचार संहिता लागू झाली असून प्रयेक कार्यकर्ता व मतदार संघातील जनता कोण्या पक्षाचा उमेदवार कोण? याची चुरस सगळ्याना लागली आहे. पण सोशल मीडियामध्ये मुर्तीजापुर मतदार संघ शरद पवार गटाला सुटण्याचे दिसत आहे.

मुर्तीजापुर मतदार संघ हा कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असून अनुसूचित जातीचे रोस्टर जेव्हा पासून येथे लागले तेव्हा पासून भाजपचा हातात गेला आहे. मागील १५ वर्षापासून का बर तालुक्यात मोठे नेते असून सुद्धा पराजायला राष्ट्रवादीला समोर जावे लागत आहे?

राजकीय विश्लेषकांचे म्हणने असे आहे कि पक्षांतर्गत स्पर्धेला बळी गेला असून, नेते मंडळीचा अहंकार यातला सर्वात मोठा कारण असल्यामुळे हा पक्ष १५ वर्षापासून जिंकु शकला नाही.

राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडून न येण्याची काही प्रमुख कारणे.

जसं इथे आजी-माजी आमदार मोठे पदाधिकारी व मोठमोठे शेतकरी नेते म्हणून घेणारे बडे नेते मतदार संघात आहे.

स्थानिक किंवा कुठलाही होतकरू उमेदवार इथे निवडून येऊ नये या करीता छुपा प्रयत्न असतो कारण इथे त्यांचा अहंकार आडवा येतो.

आपल्यापेक्षा इथे दुसरा कुठला चांगला नेता तयार होऊ नये यावर जास्त भर असतो.

पक्षाला दाखवायचे आम्ही सर्व करतो परंतु करायचे सर्व उलटे त्यामुळे राष्ट्रवादी इथे वाढू शकत नाही.

कार्यकर्ते भरपूर इच्छुक उमेदवार भरपूर तरीसुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून का येत नाही हा प्रश्न तर प्रत्येक नागरिकाला पडतो

कारण इथे काही आम्ही शेतकरी नेता आम्ही जेष्ठ नेता आहोत आम्ही विशिष्ट लॉबी चालवतो आम्ही विशिष्ट लॉबीचे आहोत.

या पक्ष अंतर्गत अहंकारात पक्षालाच नुकसान होत आहे . या विशिष्ट लॉबीतील कार्यकर्त्यांना नेत्यांना दुसरा कुठलाही मोठा झालेला बघवत नाही.

आपले मोठे मोठे घोटाळे उघड होऊ नये व आपली ठाकुरकि टिकून राहावी ,याकरिता विरुद्ध पक्षाशी छुपी युती करून त्यांचा छुपा प्रचार चालतो.

राष्ट्रवादी पक्ष आपला बालेकिल्ला परत कसा जिंकू शकेल ?

राजकीय विश्लेषकांचा चर्चे प्रमाणे

मुर्तीजापुर मतदार संघाचा इतिहास पहिला तर इथे फक्त हिंदू दलितच निवडून येतो. जातीपातीचे राजकारण, मतदानाची विभागणी, पैसे खर्च करण्याची ताकद गावाचा उमेदवार कि बाहेर गावाचा उमेदवार, निवडणूक झाल्यावर वर पण कोण खंबीरपनाणे परत उभा राहतो ग्रामपंचायत पासून लोकसभे पर्यंत कोण झीजतो? पक्षाचा कठीण वेळेत कोण उभा राहतो? पक्षाचा झेंडा १२ महिने ३० दिवस ४ आठवडे २४ तास कोण मिरवतो. या अपयश जरी आले तर खचून न जाण्याची क्षमता व हिम्मत ज्याचा मध्ये आहे. तसेच मागील निवडणुकीचा आढावा घेऊन पक्षाला आपली रणनीती तयार करावी लागेल.

अशे अनेक मुद्दे पक्ष श्रेष्टीनां बारकाईने विचार करून नंतर उमेदवारीचे तिकीटा साठी कोणाची शिफारस करायची, कोणाला घोषित करायची हे ठरवावे लागेल असे मत राजकीय विश्लेषकांचे आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!