Join Whatsapp

शिवसेना वसाहत बनली शहरातील अवैध धंद्याचे मुख्य केंद्र ?

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – १४ ऑक्टोबर २४ अकोला – शिवसेना वसाहत नेहमी कुठल्या न कुठल्या विषया वर नेहमी चर्चेत असते.

हा भाग नेहमी गजबजलेला असून या भागात अंदाजे तेरा हजार लोकसंख्या आहे. हा भाग शहरात जणू एक गावच आहे. येथील लोक खूप गुण्या गोविंदाने नांदत असतात. तसेच वेळ पडल्यास विधानसभा लोकसभा निवडणुकीत एक जुटीने येऊन लोकतंत्राची ताकद दाखवून निवडणुकीचा रंग बदलू शकतात एवढी क्षमता या भागामध्ये आहे.

या भागातील लोकांची पोच गल्ली ते दिल्ली पर्यंत असून येथे घरा घरात दिग्गज राजकारणी आपल्याला पाहायला मिळतात, काही पक्षातील कार्यकर्ते आपले दोन नंबरचे धंदे या भागात सर्रास पद्धतीने चालविताना दिसत आहे.

या भागात दारू, गांजा,अफीम वरली, मटके, लॉटरी हे व्यवसाय खुल्या पद्धतीने चालवत आहे. यामध्ये कुठल्या राजकीय नेत्यांचा या दोन नंबरच्या धंदा करणाऱ्या टोळीवर आशीर्वाद आहे का? की पोलीस प्रशासना सोबत यांची साठ गाठ आहे ?

तसेच शहरात चालणारे अवैध धंदे इथूनच चालवले जात असून शिवसेना वसाहत सध्या अवैध धंद्यांचा केंद्रबिंदू बनली आहे, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

नेमकं कोणाच्या जोरावर शिवसेना वसाहतीत दोन नंबरचे धंदे खुल्या पद्धतीने सुरू आहे ? व याचा जबाबदार कोण? असे प्रश्न आता उपस्थित होत आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!