Join WhatsApp group

इम्फाल मणिपूर येथे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे माजी विद्यार्थ्यांची सभा संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र भुयार – नुकताच 28 सप्टेंबर रोजी मणिपूर राज्याची राजधानी इम्फाल येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे माजी विद्यार्थी यांची सभा मनिपुर राज्याचे माजी विद्यार्थी संघटना चे माननीय अध्यक्ष प्राचार्य रणजीत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

त्या वेळी डॉ संजय तीरथकर व डॉ कॅनडि सिंग अमरावती वरून इन्फाल गेले होते प्रामुख्याने डॉ. अमोबा,डॉ. राजन, डॉ अनंता ,डॉ. संतोष,डॉ. विद्यापती उपस्थित असून जवळपास 60 ते 70 विद्यार्थ्यांची व पदाधिकाऱ्यांची सभा संपन्न झाली. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले व्यायाम शाळेविषयी व संस्थेविषयी त्यांच्या भाषणातून त्यांच्या भेटीतून फार जिव्हाळा असल्याचे जाणवले.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामुळे आमच्या जीवनाचा विकास झाला व आम्हाला नोकरी मिळून शारीरिक शिक्षणाचे व खेळांमध्ये योगदान देण्याचे भाग्य आम्हाला मिळाले हे सुद्धा त्यांच्या भाषणातून व्यक्त केले, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी भरपूर आशीर्वाद दिले वारंवार त्यांची प्रशंसा त्यांच्या कार्यपद्धतीची कौतुक मनोगततून व्यक्त केले मणिपूर राज्याची माजी विद्यार्थी संघटना आणखी बळकट कशी होईल ,

शारीरिक शिक्षणाचे महत्त्व कसे वाढेल, नवीन प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार (जॉब )कसा मिळेल अशा अनेक विषयावर सुद्धा चर्चा करण्यात आली.श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी अमरावतीला व्यायाम शाळेमध्ये येण्याचे सुद्धा आश्वासन दिले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!