Join WhatsApp group

Ads

पिंजर पोलिसांच्या नाकाखाली नेमकं काय सुरू होतं? अचानक एलसीबीची धडक; कारवाईने उडाली खळबळ!

By Sarkarmzanews

November 25, 2026 12:31 pm

Ads

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा; स्थानिक पोलिसांना सुगावा नव्हता की एलसीबीच्या धडकेने काहींची झोप उडाली?

अकोला : पिंजर पोलीस स्टेशनपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर… पिंजर बसस्थानक परिसरात… आणि तिथे सुरू होता कथित जुगाराचा डाव!

मात्र, या डावावर अचानक पडदा टाकला तो स्थानिक पोलिसांनी नव्हे, तर थेट अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने! काल सायंकाळच्या या धडक कारवाईने पिंजर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने पिंजर बसस्थानक परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

मात्र, या कारवाईनंतर एक प्रश्न अधिक चर्चेत आला आहे. पोलीस स्टेशनपासून इतक्या जवळ जुगाराचा डाव रंगत होता, तर स्थानिक पोलिसांना त्याची खबर नव्हती का?की या अवैध व्यवसायाकडे कोणाचे लक्षच नव्हते? नियमित गस्त, गोपनीय माहिती आणि स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा नेमकी काय करत होती? एलसीबीच्या अचानक धडकेने हे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत.

विशेष म्हणजे, जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात वरिष्ठ पातळीवर मोहीम सुरू असताना स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतच असा प्रकार समोर येणे ही निश्चितच गंभीर बाब आहे.

त्यामुळे आता केवळ जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपणार की स्थानिक यंत्रणेच्या भूमिकेचीही चौकशी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

एलसीबीच्या या कारवाईत नेमके कोण कोण सापडले? किती मुद्देमाल जप्त झाला? आणि पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ सुरू असलेल्या या डावाची माहिती कोणाला होती? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

जुगाराचा डाव उधळला गेला; पण या डावामागील दुर्लक्षाचा डाव कोण उघड करणार? हा खरा प्रश्न आहे!

अद्याप अकोला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने याची पुष्टी प्रेस नोटचा माध्यमाने सध्या केलेली नाही.

NEWS PHOTO – AI GENRATED

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!