Join WhatsApp group

Ads

विरोधक बनणार होते; मित्रपक्षच मजबूत झाला!मूर्तिजापूरच्या राजकारणात ‘भगवा’ समीकरणाचा नवा डाव; पाच नगरसेवक शिवसेनेत

By Sarkarmzanews

November 1, 2026 1:19 pm

Ads

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर नगरपरिषदेतील चार अपक्ष नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याने स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे शिंदे सेनेची नगरपरिषदेतील संख्या सहा पोहोचली आहे.

या पक्षप्रवेशामुळे भाजप-शिवसेना महायुतीचे स्थानिक राजकीय गणित अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काही काळापूर्वी प्रभावी विरोधी गट उभा करण्याची चर्चा होती. मात्र आता विरोधकांची ताकद वाढण्याऐवजी महायुतीतील मित्रपक्षच मजबूत झाल्याने राजकीय समीकरण बदलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, या पक्षप्रवेशाभोवती राजकीय वर्तुळात १५ लाख रुपयांच्या चर्चेनेही जोर धरला आहे. हा आकडा नेमका कशासाठी आणि कोणत्या संदर्भात चर्चेत आहे, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अथवा ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे ही सध्या केवळ राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर आणखी एक सवाल उपस्थित होत आहे—पडद्यामागे विद्यमान राजकीय खेळाडू आहे की माजी राजकीय खेळाडू? नगरसेवक स्वतःच्या राजकीय भवितव्याचा विचार करून शिवसेनेत गेले की या प्रवेशामागे मोठे स्थानिक राजकीय व्यवस्थापन आहे, याची चर्चा रंगली आहे.

भाजपमधील एखाद्या ‘अदृश्य शक्ती’ची भूमिका आहे का? यालाही अधिकृत दुजोरा नाही. मात्र शिवसेना मजबूत झाल्याने व्यापक अर्थाने महायुतीची ताकद वाढणार असल्याचे राजकीय संकेत आहेत.

आता मूर्तिजापूरच्या राजकारणात खरा प्रश्न एकच—विरोधक उभा करायचा होता की मित्रपक्ष मजबूत करायचा होता? आणि या राजकीय खेळातून काही नेत्यांना ‘घरचा आहेर’ मिळाला का? आगामी हालचाली हे गणित आणखी स्पष्ट करतील.

पत्नी राष्ट्रवादी (शरद पवार ) गटात नगरसेविका आणि पती मात्र शिंदे गटात हा नेमका खेळ काय?

Related Article

बार्शीटाकळीत ३५ टन संशयित तांदळाला ‘बिलांचे कवच’?चार दिवसांनी गुन्ह्याची प्रक्रिया; आता कागदपत्रांची सत्यता तपासणार कोण?

‘Pure’च्या दाव्यापासून सुट्या तेलापर्यंत… अकोला FDAचा दिवाळीपूर्वी ‘क्वालिटी वॉच’!

निवडणूक प्रचारात इतक्या व्यस्त झाल्या की… ‘उमेदवारी अर्ज’ भरणंच विसरल्या!

उपोषण सुरू होताच ‘विना आमंत्रित’ नेत्यांची एन्ट्री! आजकल चर्चेचा विषय

रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराच्या वाटेवर?सिंदखेड बायपासवर ट्रक ताब्यात; आता तपासात काय समोर येणार? ‘बिल दाखवा आणि प्रकरण मिटवा’चा पॅटर्न तर नाही ना?

🚨 मोठी बातमी | सरकार माझा न्यूज वरप्रमाणपत्राचा ‘खेळ’ पडणार उघड?नोंदीत तफावत, रक्तनात्याचे पुरावे मागवले; चौकशीवर दबावाच्या चर्चेने खळबळ!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!