Join WhatsApp group

Ads

-

रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराच्या वाटेवर?सिंदखेड बायपासवर ट्रक ताब्यात; आता तपासात काय समोर येणार? ‘बिल दाखवा आणि प्रकरण मिटवा’चा पॅटर्न तर नाही ना?

By Sarkarmzanews

October 27, 2026 12:40 pm

Ads

बार्शीटाकळी : गरिबांच्या हक्काच्या रेशनच्या तांदळाचा साठा काळ्या बाजारात जात असल्याच्या संशयावरून बार्शीटाकळी पोलिसांनी सिंदखेड बायपासवर धडक कारवाई केली. तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, वाहन बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले आहे. सद्यस्थितीत पुढील कारवाई सुरू आहे.

मात्र या कारवाईनंतर सर्वात मोठा प्रश्न आहे—

तपासात नेमके काय सिद्ध होणार?

ट्रकमधील तांदूळ कुठून आला? तो कोणाच्या नावावर आहे? कुठे नेला जात होता? वाहतुकीसाठी कोणती कागदपत्रे आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतीलच आहे का, याची पडताळणी होणे आवश्यक आहे.

‘बिल’ दाखवून प्रकरण संपणार की साखळी उघड होणार?

अकोला जिल्ह्यात यापूर्वीही धान्य वाहतुकीशी संबंधित कारवायांनंतर बिल, चलन अथवा कागदपत्रांच्या आधारे मालाची वाहतूक वैध असल्याचे सांगून प्रकरण पुढे नेले गेल्याच्या चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी केवळ कागदोपत्री बिल पाहून निष्कर्ष काढण्याऐवजी त्या बिलाची सत्यता, मालाचा प्रत्यक्ष स्रोत, साठ्याची नोंद आणि संबंधित संस्थेची कागदपत्रे यांची स्वतंत्र पडताळणी होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारण बिल असणे म्हणजे माल वैध असल्याचा अंतिम पुरावा नाही; त्या बिलामागील व्यवहारही तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे.ट्रक पकडला, आता ‘मालाचा प्रवास’ तपासा!

या प्रकरणात पोलिस आणि संबंधित पुरवठा यंत्रणा केवळ ट्रक व तांदळाची मोजदाद करून थांबणार की धान्याच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा माग काढणार, याकडे लक्ष लागले आहे.

जर तांदूळ रेशनचा असल्याचे निष्पन्न झाले, तर तो काळ्या बाजाराच्या दिशेने कसा वळला, याचा तपास होणे गरजेचे आहे. आणि जर तांदूळ वैध असल्याचे निष्पन्न झाले, तर त्याची वैध कागदपत्रे व मालाचा स्रोत अधिकृतपणे स्पष्ट होणेही तितकेच आवश्यक आहे.

ट्रक पकडला आहे; पण तपास फक्त ट्रकपुरता राहणार की तांदळाच्या मागची संपूर्ण साखळी उघड होणार?आता कारवाईच्या अंतिम निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

🚨 मोठी बातमी | सरकार माझा न्यूज वरप्रमाणपत्राचा ‘खेळ’ पडणार उघड?नोंदीत तफावत, रक्तनात्याचे पुरावे मागवले; चौकशीवर दबावाच्या चर्चेने खळबळ!

मटक्यावर कारवाई, बुकींचे काय?एकावर गुन्हा; शहरातील कथित मटका नेटवर्कवर पोलिसांची नजर आहे का?

चंद्राकडे पाहत दूध पिणार, पण दुधाकडे कोण पाहणार?

मसाल्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; अकोल्यात दोन आस्थापनांवर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई

खाणमालकच खाणमालकांच्या विरोधात? पडद्यामागे नेमकी ‘भानगड’ काय?सहा मीटरचा नियम, ३० मीटर उत्खननाचा दावा अन् ब्लास्टिंगचा मुद्दा; कोण कोणाला लक्ष्य करत आहेत?

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!