Join WhatsApp group

Ads

-

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

By Sarkarmzanews

October 23, 2026 9:25 am

Ads

तपासणी पथकाला घटनास्थळी इंजेक्शन आढळले नाही; डोपिंगचा ठोस पुरावा नसल्याचा दावा

अकोला : स्व. वसंत देसाई स्टेडियम परिसरात संशयास्पद इंजेक्शन आढळल्याच्या वृत्तानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने याबाबत अधिकृत खुलासा केला आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या तपासणी पथकाने संबंधित ठिकाणी पाहणी केली असता तेथे कोणतेही इंजेक्शन आढळून आले नसल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने २२ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या खुलाशानुसार, यापूर्वी आढळलेले इंजेक्शन बाहेरून आणण्यात आले होते की स्टेडियम परिसरात त्याचा वापर करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता अथवा ठोस पुरावा तपासणी पथकाला मिळालेला नाही. त्यामुळे केवळ इंजेक्शन आढळल्याच्या आधारे स्टेडियममधील खेळाडूंशी डोपिंगचा संबंध जोडता येणार नसल्याचे प्रशासनाच्या भूमिकेतून स्पष्ट होते.

दरम्यान, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या नियंत्रणाखालील प्रशिक्षण केंद्रांमध्ये खेळाडूंना डोपिंगचे दुष्परिणाम, शारीरिक नुकसान आणि त्यासंदर्भातील नियमांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जात असल्याचेही खुलाशात नमूद करण्यात आले आहे. डोपिंगसंबंधी औषधे अथवा इंजेक्शनची अधिकृत तपासणी करण्याचे अधिकार नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) यांच्याकडे असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

पुरावा असल्यास सादर करण्याचे आवाहन

सदर प्रकरणासंदर्भात डोपिंगचा कोणताही पुरावा उपलब्ध असल्यास तो जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. असा पुरावा मिळाल्यास तो NADA कडे पाठवून त्याची शहानिशा करण्यात येईल आणि डोपिंगसंबंधी तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई केली जाईल, अशी भूमिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने घेतली आहे.

संशयास्पद इंजेक्शन नेमके कुठून आले, त्याचा वापर कोणी केला आणि त्याचा डोपिंगशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष तपासणी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच समोर येणे अपेक्षित आहे.

Related Article

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!