Join WhatsApp group

Ads

-

मूर्तिजापूर मध्ये शांतता समितीचा बैठकीला नागरिकांचे व गणेश मंडळाचे ऊस्फूर्त प्रतिसाद

By Sarkarmzanews

September 22, 2026 7:48 pm

Ads

मुर्तिजापुर : सण उत्सव साजरे केले जात असताना सर्वच नागरिकांचे सहकार्य मोलाचे आहे. शिस्त पाळून आणि कायद्याच्या चौकटीत आपण सण साजरे केले तर कुठलीही त्रासदायक स्थिती निर्माण होणार नाही. इतरांना त्रास होणार नाही.याची काळजी गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे.

गणेश मिरवणुकीच्या मार्गात कुठलाही बदल होणार नाही. मुर्तीजापुर हे शांत शहर असून येथील सर्वांनी पोलीस विभागाला सहकार्य करावे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डीजे वाजवताना आवाजाच्या डेसिबल मर्यादेचे पालन करावे.तसेच प्रत्येक मंडळाकडे एक दत्तक अंमलदार देण्यात येणार असून त्यामार्फत मंडळाच्या समस्या सोडविण्यास मदत होईल.

आतापर्यंत गुन्हेगारी वृत्तीच्या ८०० लोकांना तडीपार करण्यात आलेले आहे.

दोन टॉप आणि एक बेस अशाप्रकारे आपण डीजे वाजू शकता परंतु आवाजाची मर्यादा ठेवणे बंधनकारक आहे. आवाजाची मर्यादा ओलांडली तर एक वेळा पोलीस चेतावणी देतील परंतु दुसऱ्या वेळेस डीजे जप्त करून गुन्हे दाखल केल्या जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले. मुर्तीजापुर येथील राधा मंगलम येथे मुर्तीजापुर उपविभागाच्या आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर बैठकीचे अध्यक्ष म्हणून आमदार हरीश पिंपळे यांची उपस्थिती होती.तर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार तसेच गटविकास अधिकारी मोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे,निवासी तहसीलदार लोखंडे मॅडम त्याचप्रमाणे महावितरणचे उपविभागीय अभियंता बजाज मॅडम,नगराध्यक्ष हर्षल साबळे, बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता बजाज मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या बैठकीला शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी,बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार वानखेडे,माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकर,बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार परिवेक्षाधिन पोलीस उपविभागीय अधिकारी कांदे, मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार महाडिक यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे माधवराव काळे विनायक गुल्हाने,कैलास महाजन यांनी विचार मांडले. कावड यात्रेदरम्यान कावड मंडळांनी एकमेकांच्या जिद्दीवर वाजवलेल्या डीजेमुळे अनेकांना याचा त्रास होऊन काही जणांचे कान कायमचे बधीर झाले.तर काहींना त्रास होत असल्याने डिजेच्या आवाजावर मर्यादा घालाव्यात अशी मागणी करण्यात आली.

तसेच गणेश मंडळांनी डीजेवर पैसे खर्च न करता तो पैसा दुष्काळ काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जपून ठेवावा असे सांगण्यात आले. यावेळी संदीप कुमार अपार यांनी देखील विचार मांडताना डीजे वाजविणे हितकारक नसल्याचे सांगितले.

तर अध्यक्षीय विचार मांडताना आमदार पिंपळे यांनी सांगितले की डीजे तसेच अवैद्य देशी दारू विक्री करणाऱ्यांसह, जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी.

कुठली हयगय करू नये असे सांगितले.सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी व्यक्त केले. आभार परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आनंद कांदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने करण्यात आला.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!