Join WhatsApp group

मुर्तीजापूर मध्ये तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर, ता. २५ :जितापूर ते मुर्तिजापूर दरम्यानच्या रेल्वे पटरीजवळ झालेल्या भीषण अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संदेश वामनराव चौरपगार (रा. जितापूर नाकट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान सुरज देवीदास खंडारे (वय १९, रा. पंचशिल नगर, मुर्तिजापूर) हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. MH 30 BY 4136 TVS रायडर) भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवित असताना रेल्वे ट्रॅक जवळील लोखंडी पोलला धडकला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेवरून मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अप नं. 431/25 कलम 106(1), 281 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास API अनिल पवार करत असून, दाखल अंमलदार म्हणून HC मंगेश घाटे यांनी काम पाहिले.

👉 निष्काळजी वाहनचालना हीच अपघातास कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!