Join Whatsapp

ह.व्या.प्र. मंडळा चा अनुज सारवानला कै.खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक

Photo of author

By Sir

Share

जितेंद्र भुयार अमरावती – महाराष्ट्र शासन , क्रीडा व युवक संचालनालय पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे 7 ते 9ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या संपूर्ण महाराष्ट्रातून दहा संघ या स्पर्धे करता निवड झालेली होती.

विदर्भातला एकमेव संघ अमरावती शहर जिल्हा कुस्तीगीर संघ यांची निवड झालेली होती. त्या स्पर्धेमध्ये फ्रीस्टाइल ग्रीक रोमन व महिला संघ प्रत्येक संघाचे दहा दहा खेळाडू एक टीम मॅनेजर एक कोच दोन कुस्तीची मॅच या सिल्लोड मध्ये भव्य प्रमाणामध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते

त्यामध्ये लाखो रुपयांचे बक्षीस स्वरूपात खेळाडूंना मिळाले. अमरावती शहर जिल्हा कुस्तीगीर संघा च्या वतीने 63 किलो वजन गटात अनुज सारवान यांनी सहभाग घेतला होता ह्याची पहिली कुस्ती अरबाज शेख धुलिया यांच्यासोबत झाली अनुजने या अशा बलाढ्य पैलवानांना 4 – 0 नी हरवला दुसरी कुस्ती कोल्हापूरचा बलाढ्य पैलवान सागर पाटील याला 6- 2 नी हरवला तिसरी कुस्ती फायनल ची अटीतटीची कुस्ती साताराचा यश जाधव याला आसमान दाखवून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

25 हजाराची रोख रक्कम प्रशस्तीपत्र व सुवर्णपदक यांना मिळाले. अनुजने खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल अमरावती जिल्ह्यात व विदर्भामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय आनंद झाला आहे.

विदर्भ कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय रामदासजी तडस अमरावती शहर जिल्हा संघाचे अध्यक्ष माननीय डॉ.श्रीकांत चेन्डके कार्याध्यक्ष डॉ संजय तीरथकर विदर्भ केसरी सचिव डॉ रणबिर सिंह, कुस्ती संस्थेचे संरक्षक पद्मश्री प्रभाकरराव वैद्य एडवोकेट प्रशांत देशपांडे यांनी अभिनंदन केले. अमरावती शहर जिल्ह्याचे पदाधिकारी माननीय राजेश जयपुरकर, जितेंद्र भुयार, भास्कर राव टोम्पे, अभय माथने,हाजी रम्मु शेठ, संजय पवार, हेमंत माकोडे तसेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, डॉ माधुरीताई चेंदके, रवींद्र खांडेकर , यांनी खेळाडूला शुभेच्छा दिल्या.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!