Join WhatsApp group

कंझरा येथे शेतातून परतणारी महिला नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेली; वीर भगतसिंग बचाव पथकाचे सर्च ऑपरेशन सुरू

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर – दिनांक २९ ऑगस्ट २५ : तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कमळगंगा नदीला अचानक पूर आला असून, कंझरा येथील 34 वर्षीय महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना आज (दि. 29 ऑगस्ट) दुपारी उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. रेखा रमेश मते (वय 34) या शेतमजुरी करून आपल्या मुलगी साक्षी मतेसोबत शेतातून परत येत असताना कमळगंगा नदीच्या पाण्याचा अचानक लोंढा आल्याने दोघीही नदीत वाहून गेल्या.

यात मुलगी साक्षी हिने काटेरी झुडपाचा आधार घेत आपले प्राण वाचवले, मात्र आई रेखा या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे, तहसीलदार शिल्पा बोबडे, ठाणेदार श्रीधर गुट्टे, दीपक कानडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

यावेळी कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शोध मोहीम हाती घेतली आहे.

विजय माल्टे, शाहबाज शहा, मोहन वाघमारे, उमेश माल्टे, अक्षय मोरे, शुभम दामोदर, शेख वसीम, दिनेश श्रीनाथ यांच्यासह जवान पथक नदीत सर्च ऑपरेशन करत आहेत.

घटनास्थळी पोलिस पाटील जितेंद्र लांडे यांच्यासह पोलीस व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित असून महिलेचा शोध सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!