Join WhatsApp group

सध्या दारूचे भाव वाढल्याने देशी दारू पिणाऱ्यांचा गावठी दारूकडे वाढता कल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

📍 मुर्तिजापूर / स्थानिक विशेष बातमी 📍

दिनांक ३ जून २५ : सध्या बाजारात देशी दारूच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्य आणि कामगार वर्गातील दारू पिणाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वाढत्या महागाईमुळे देशी दारू घेणे परवडत नसल्याने अनेकजण पर्याय म्हणून गावठी दारूकडे वळत आहेत. या साठी स्टेशन परिसरात एका भागात यांची वर्दळ पाहायला सध्या मिळत आहे. या भागात मध्यप्रेमीना २४ तास गावठी दारूची सुविधा उपलब्ध आहे.

🧑‍🌾 कामगार, शेतमजूर वर्ग सर्वाधिक प्रभावितरोजंदारीवर काम करणारा, शेतीवर अवलंबून असलेला वर्ग देशी दारूला आता महाग मानू लागला आहे. पूर्वी 100-120 रुपयात मिळणारी बाटली आता 150-180 रुपयांपर्यंत गेल्याने सामान्य ग्राहकांचा कल गावठी दारूकडे वाढत आहे.

🚨 गावठी दारूचा व्यवसाय वाढीलाया संधीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करून विक्री केली जात आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

👮 पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची डोळ्याआड भूमिका? काही ठिकाणी गावठी दारूचा खुला व्यापार सुरू असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहेत.

📣 जागरूकता आणि कारवाईची गरज अवैध दारू विक्रीवर बंदी घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनीही आरोग्याला धोकादायक असलेल्या गावठी दारूपासून दूर राहावे. असे बुध्दी जीविकांचा सल्ला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!