Join WhatsApp group

“मध्यप्रदेश वरून प्रभाग चालणार का? — धनश्री बबलू भेलोंडे यांचा सवाल”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर: दिनांक ३०: नगरपरिषद निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्थानिक प्रतिनिधी हवा की बाहेरून आणलेल्या उमेदवारावर विश्वास ठेवावा, यावर वातावरण चांगलेच तापले आहे.

सध्याच्या नगरसेविका धनश्री बबलू भेलोंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रलंबित कामे पूर्ण केल्याचा दावा प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की.

मागील कार्यकाळात —

गोदु शेठ किराणा गल्लीतील नाली प्रश्न मार्गी लावणे.

सराफा लाईनमधील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन (2018).

कॉटन मार्केट रोडचे डांबरीकरण.

महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम.

तसेच अनेक दैनंदिन नागरी समस्यांचे समाधान.

अश्या कामांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

भेलोंडे यांनी विरोधी उमेदवारावर गंभीर आरोप करताना म्हटले की,

“एका परिवाराने आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी पार्सल उमेदवार प्रभाग क्रमांक ९ मध्ये उभा केला आहे.” विशिष्ट समाजाचा जोरावर त्यांनी हा बालिशपणा करून समाजाला व मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रयत्न आहे.

यावेळी त्यांनी विरोधकांवर तिखट प्रश्नही उपस्थित केले —

“प्रभागातील प्रश्न मध्य प्रदेश मध्ये बसून सोडवले जाणार आहेत का?”

“या उमेदवाराचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास काय आहे?”

“सामाजिक कामात त्यांचा नेमका वाटा काय?”

“मुर्तीजापूर शहरात किंवा प्रभागात एक तरी उपक्रम केला आहे का?”

“जनतेशी नाळ, संपर्क किंवा कोणतीही प्रत्यक्ष कामाची नोंद आहे का?”

भेलोंडे यांचे म्हणणे आहे की हे प्रश्न नागरिकांसमोर पारदर्शकपणे ठेवणे आवश्यक आहे.

या आरोप–प्रत्यारोपांमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये वातावरण अधिकच तापले असून स्थानिक प्रतिनिधी विरुद्ध बाहेरून आणलेल्या उमेदवाराचा मुद्दा आता निवडणूक चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!