Join WhatsApp group

“भूमी अभिलेखचा मनमौजी कारभाराला लगाम बसणार? उपअधीक्षक भास्कर सदार यांच्या कार्यशैलीवर लक्ष”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक ०५: भूमी अभिलेख विभागात उपअधीक्षक म्हणून भास्कर वामनराव सदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे विभागातील कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

मुर्तिजापूर भूमी अभिलेख कार्यालयाविषयी काही वर्षांपासून तक्रारींचा पाढा वाढत होता. कार्यालयातील भ्रष्टाचार, प्रक्रियेत होणारा विलंब, तसेच काही अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार यामुळे सामान्य जनतेचा या विभागावरील विश्वास डळमळीत झाला होता. यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील एकूण शासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर भास्कर वामनराव सदार यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरत आहे. याआगोदर मुर्तिजापूर शहरात मागील कार्यकाळात ते कर्मचारी म्हणून कार्यरत होते व त्यामुळे त्यांना शहरात काम करण्याचा थेट अनुभव आहे. त्यामुळे स्थानिक गरजा, समस्या आणि प्रलंबित प्रश्नांची माहिती त्यांना प्रत्यक्ष असून, या अनुभवाचा फायदा आगामी कामकाजात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नव्या उपअधीक्षकांकडून पारदर्शक, परिणामकारक आणि वेळेवर कामकाजाची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विभागातील मनमौजी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवून शिस्तबद्ध कारभार सुरू होणार का? भ्रष्टाचाराचे उगमस्त्रोत कमी केले जातील का? आणि प्रलंबित कामे वेळेत मार्गी लागतील का? — असे अनेक प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात आहेत.

येणाऱ्या काळात त्यांच्या कार्यशैलीतून आणि प्रशासनिक निर्णयांतूनच या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. मुर्तिजापूरच्या नागरिकांची नजर आता पूर्णपणे सदार यांच्याकडून होणाऱ्या बदलांवर केंद्रित झाली असून, त्यांच्या नियुक्तीनंतर भूमी अभिलेख विभागात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!