Join WhatsApp group

पिंपळे यांच्या ‘अतिआत्मविश्वास व एकहाती सत्ता-शैली’चा भाजपला फटका?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

निवडणुकीनंतर नाराजीचा ज्वालामुखी उसळणार – २१ डिसेंबरच्या निकालाकडे शहराचे लक्ष

मुर्तीजापूर – दिनांक ४ : नगरपरिषद निवडणुकी मध्ये तिकीट वाटपावरून भाजपमध्ये असंतोषाचा स्फोट झाला असून आमदार हरीश पिंपळे यांच्या अतिआत्मविश्वास व एकहाती, मनमानी नेतृत्वशैलीवर गंभीर आरोप होत आहेत.
२१ डिसेंबरला येणाऱ्या निकालावर या नाराजीचा थेट परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


लकडगंजचे ‘भाजप पॉवर स्टेशन’— आज असंतोषाचे प्रमुख केंद्र

भाजपचे मजबूत केंद्र असलेल्या लकडगंजमध्येच सर्वाधिक राग उसळलेला दिसतो आहे.
तिकीट वाटपात आमदारांचा एकतर्फी हस्तक्षेप, ज्येष्ठ कार्यकर्त्यांची उपेक्षा आणि तरुण चेहऱ्यांवर अवलंब—यामुळे पक्षामधील कार्यकर्ते हळू हळू पक्षापासून दूर जाण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

कार्यकर्त्यांचा कडक आरोप—
“भाजप नाही, तर पिंपळे यांच्या मर्जीनुसार उमेदवार ठरतात.”

मतदानाच्या दिवशी काही दिग्गज कार्यकर्ते विरोधी उमेदवारांना खुला पाठिंबा देत असल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.


एकतर्फी तिकीट वाटपाचा थेट परिणाम :

अनेक प्रभागांत भाजपचे उमेदवार ‘कमी मतांनी निवडून’ येण्याची शक्यता.

या मनमानी तिकीट वाटपाचा प्रत्यक्ष फटका भाजपच्या स्वतःच्या उमेदवारांनाच बसणार असल्याचे चित्र समोर येत आहे.
काही प्रभागांत नाराज कार्यकर्त्यांचे मतांतर, मतदानातील दुहेरी खेळी आणि सामाजिक मतांचे ध्रुवीकरण यामुळे भाजपचे उमेदवार अत्यल्प मतांनी निवडून येतील किंवा काही ठिकाणी पिछाडीवर पडतील, अशी चर्चा आहे.

स्थानिक विश्लेषकांचे स्पष्ट मत आहे कि “ज्याठिकाणी तिकीट वाटपात अनियमितता झाली, त्या प्रभागांत भाजपला कमी आकड्याने समाधान मानावे लागू शकते.”


अनुभवी कार्यकर्त्यांची उपेक्षा — नाराजीचा कडेलोट

युवा चेहऱ्यांना पुढे केले असले तरी अनुभवी आणि जम बसलेले कार्यकर्ते वगळल्याचा आरोप वातावरण तापवतो आहे.
सर्वांचा तोंडी एकच चर्चा आहे कि
“अनुभवी लोकांना सोडून घेतलेले निर्णय भाजपला महागात पडणार.”


पिंपळे यांचा आणखी दडपशाही विधान ‘गद्दार कार्यकर्त्यांना ६ वर्ष निलंबन’ इशारा— नाराजीला आणखी हवा

भाजपविरोधात काम करणाऱ्यांना ६ वर्ष निलंबन करण्याचा पिंपळे यांचा इशारा तळागाळात उलट पडला आहे.
कार्यकर्त्यांचे मत—
“ही शिस्त नव्हे, दडपशाही आहे.”


निकालावर टांगलेला प्रश्न :

भाजपचे आकडे घटतील का?

२१ डिसेंबरच्या निकालाकडे पाहताना आज सर्वात मोठा प्रश्न असा—

“एकतर्फी निर्णयांची किंमत भाजपला किती मोजावी लागणार?”

“अनेक प्रभागांत उमेदवार कमी मतांनी निवडून येण्याची वेळ येईल का?”


भाजपला फटका विरोधकांचा नाही—तर घरातील भडका अधिक मोठा

पक्षातील नाराजी, चुकीचे तिकीट वाटप, कार्यकर्त्यांचे मतांतर आणि पिंपळे यांच्या नेतृत्वशैलीवरील प्रखर टीका—
या सर्व घटकांचा नगरपरिषद निकालावर परिणाम होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

मुर्तीजापूरात आज एकच प्रश्न जिवंत आहे—

“पिंपळे यांच्या अतिआत्मविश्वास व एकहाती राजकारणाचा २१ डिसेंबरच्या दिवशी भाजपला किती मोठा फटका बसणार व त्याची किंमत आमदार हरीश पिंपळे यांना भविष्यात कशी मोजावी लागणार ?”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!