Join WhatsApp group

मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनची लिफ्ट कधी सुरू होणार? नागरिकांना प्रश्न, रुग्ण, वयोवृद्ध, गरोधर महिला नागरिकांचे हाल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर – अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. नव्या स्वरूपात दादरा, प्लॅटफॉर्म, पायऱ्या आणि इतर सुविधा बांधण्यात आल्या आहेत.

मात्र, या सर्व सुविधांमध्ये महत्त्वाची असलेली लिफ्ट सेवा अद्यापही कार्यान्वित झालेली नाही.लिफ्टच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, वृद्ध व्यक्ती, अपंग नागरिक, गरोदर महिला तसेच रुग्ण यांना प्लॅटफॉर्मवर जाण्यास फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे अनेक वेळा अपघाताचीही शक्यता निर्माण होते.रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर लिफ्ट सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. लिफ्ट पूर्णतः बसवूनही ती अद्याप बंद असल्यामुळे प्रशासनाचा दिरंगाईचा कारभार उघड झाला आहे.

आता “लिफ्ट सेवा नेमकी कधी सुरू होणार?” असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलून लिफ्ट सेवा सुरू करावी, हीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!