Join WhatsApp group

प्रभाग १ व ९ : निवडणुकीनंतर बदला होण्याची शक्यता? – ‘सरेंडर की ठसन कायम?’ सस्पेन्स अधिक गडद

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर: ०५ : नगर परिषद निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक १ आणि ९ भोवतीचे राजकारण वेगाने बदलत असून शहरातील राजकीय वातावरणात नवे वादळ उठले आहे. निकाल लागल्यानंतरही वातावरण शांत न होता उलट राजकीय खेळीचा अधिक भडका उडणार आहे.

सत्तेसाठी नियमांना धाब्यावर बसवणे, अचानक भूमिका बदलणे, किंवा स्वतःची ताकद दाखवण्यासाठी अनपेक्षित कृत्ये करणे—ही दृश्ये आपण नेहमी पाहतोच. मात्र या वेळी घडलेल्या काही हालचालींनी वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले असून स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

ज्यांनी दुसऱ्यांचा घरावर दगड मारले त्यांचे घर सुद्धा काचाचेच आहेत.

स्टंटबाजीने आपल्याच वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले.

सूत्रांचा अनुसार निवडणुकीत आजआपली सीट धोक्यात आली असे कळताच एका उमेदवाराने निवडणूक झाल्यावर थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाऊन स्टंटबाजी केल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

या प्रकारामुळे हा उमेदवार थेट वरिष्ठ नेत्यांच्या डोळ्यात घातला गेला, आणि यानंतर अवघ्या अर्ध्या तासात या उमेदवाराचे ‘गेम फिट करण्याचा’ निर्णय उच्चस्तरीय राजकीय वर्तुळात घेतल्याचे सांगितले जात आहे.

त्या मध्ये एक विशिष्ट सामाजिक नेता जे एक विशिष्ट समाजाचे व राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तर दुसरे अकोल्या जिल्ह्यातील एका पक्षाचे प्रमुख तर तिसऱ्याची ख्याती अमरावती ते मुंबई पर्यंत आहे. अश्या नेत्यान पर्यंत ही बातमी पोहचली असताना हे राजकीय शिष्टाचार नाही असे त्यांचे एक मत होते. असे स्थानिक उमेदवार व राजकीय नेते उद्या समाजासाठी व पक्षासाठी घातक ठरणार असे त्यांचे मत आहे.

‘शो ऑफ’ करणारे नेते आता माफी मागतील का?

दरम्यान शहरातील राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे—

एका विशिष्ट समाजात जास्त शो ऑफ करणारे, जोरजोरात आपली ताकद आणि ठसन दाखवणारे काही नेते जे उमेदवार पण नाही आता परिस्थिती बदलल्यावर अचानक गुपचूप वरिष्ठ नेत्यांकडे माफी मागणार का?

की त्यांनी दाखवलेली ठसन ते पुढेही जशीच्या तशी कायम ठेवणार?

वरिष्ठ नेत्यांचे राजकारणाचे मैदान मोठे असते, आणि त्यांची मनसुद्धा मोठी असल्याचे मानले जाते. त्यामुळे प्रभाग १ आणि ९ मधील उमेदवार आपले अस्तित्व आणि राजकीय भविष्य वाचवण्यासाठी अखेरीस ‘सरेंडर’ करतील का, हा प्रश्न सध्या राजकीय गलियार्‍यात सर्वाधिक चर्चेत आहे.

गल्लीतून दिल्लीपर्यंत पोहोचलेले राजकारण

या प्रभागांतील हालचाली आता केवळ स्थानिक मर्यादेत नाहीत.

“गल्लीचं राजकारण दिल्लीपर्यंत पोहोचतं,” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरताना दिसते आहे.

स्टंटबाजी, शो ऑफ, गटबाजी आणि विशिष्ट समाजाचा भरवश्यावर स्टंटबाजी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकींच्या चर्चा—हे सर्व राजकीय तापमान आणखी वाढवतात आहे.

पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे

कोण वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन माफी मागणार?

कोण ठाम भूमिका कायम ठेवणार?

कोणाचा ‘गेम फिट’ होणार?

आणि प्रभाग १ व ९ मध्ये अंतिम बदल काय दिसणार?

भविष्यात कोर्टाचे चक्कर?

राजकारणातील हा सस्पेन्स क्लायमॅक्सकडे जात असून मुर्तीजापूरच्या राजकीय रंगमंचावर पुढील काही दिवसांत मोठे दृश्य बदलण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. जे मूर्तिजापूर शहरात कधी झाले नाही ते आत्ता पहायला मिळणार का?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!