Join WhatsApp group

प्रभाग क्रमांक 9 : मशाल चिन्ह महिला मतदारांमध्ये ठरणार निर्णायक घटक त्रिकोणी लढतीत शिवसेना (शिंदे गट) – भाजप यांच्यात रंगणार संघर्ष

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक ०१: प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणुकीत यंदा महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रभागात ‘मशाल’ चिन्हासह नवीन, तरुण चेहरा मैदानात उतरला असून त्याला महिला वर्गाचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळातील चर्चांवरून दिसून येत आहे.

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात जोरदार लढत रंगणार असली तरी, नव्या उमेदवारामुळे समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रभागातील घरकुल, पाणीपुरवठा, रस्ते व महिला सुरक्षेचे प्रश्न यंदा निवडणुकीत प्रमुख ठरणार आहेत.

या मुद्द्यांना तरुण उमेदवाराकडून मिळणारा प्रतिसाद व महिलांमध्ये मिळत असलेले सक्रीय समर्थन लक्षवेधी आहे.राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभाग क्रमांक 9 मधील महिला मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने,

‘मशाल’ चिन्ह हळू हळू पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे. आज अखेरचा दिवशी मशाल धगधगणार असून प्रभागात उजेड करून कुठे आग लावते, त्रिकोणी लढतीत मशाल छुप्या पद्धतीने बाजी मारणार का? येणार याकडे प्रभागाचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!