Join WhatsApp group

प्रभाग क्रमांक ९ : भारत जेठवानीचा गुप्त प्रचार वेगात – आमदार हरीश पिंपळे यांची विशेष टीम सक्रीय,

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रभाग क्रमांक ९ : भारत जेठवानीचा गुप्त प्रचार वेगात — सिंधी कॅम्प १००% मतदानाचा भरोसा; स्टेशन परिसरात पोजिशन मजबूत
आमदार हरीश पिंपळे यांची विशेष टीम सक्रीय, अखेरच्या टप्प्यात विरोधकाचा गेम पलटणार?

मुर्तिजापूर │ प्रभाग क्रमांक ९ मध्ये भारत जेठवानी यांच्या ‘सायलेंट प्रचार रणनीती’ने मोठा कलाटणीबिंदू निर्माण केला आहे. विशेषतः सिंधी कॅम्प परिसरात १००% मतदान होईल असा मतदारांचा ठाम विश्वास, तसेच जेठवानींचं सूक्ष्म नियोजन, संपूर्ण प्रभागात चर्चेचा विषय ठरला आहे.

स्टेशन परिसरात सायलेंट मूव्हमेंट — पोजिशन गुप्तपणे मजबूत
जाहिर शोभायात्रा, ढोल-ताशे टाळून जेठवानी गट गुप्त नेटवर्कद्वारे घराघरात पोहोचत आहे. स्टेशन परिसरात काही ‘सेफ बूथ’वर सायलेंट मोहीमचा प्रभाव स्पष्ट दिसू लागला असून, विरोधकांनी मजबूत समजलेल्या भागातही समीकरणं हळूहळू बदलत असल्याची चर्चा आहे.


आमदार हरीश पिंपळे यांची विशेष टीम सक्रीय

प्रभाग ९ मध्ये आमदार हरीश पिंपळे यांनी स्वतःची विशेष टीम तैनात केल्याची माहिती राजकीय वर्तुळात जोरदार फिरते आहे. ही टीम बूथनिहाय मॅनेजमेंट, रणनीती, मतदानाचे प्रमाण आणि मतदारांशी थेट संवाद या सर्व गोष्टींवर काम करत असल्याचे सांगितले जाते.
या टीमच्या सक्रियतेमुळे जेठवानींचा ‘सायलेंट बॅकअप’ अधिक मजबूत झाल्याचेही सूत्रांचे मत आहे.


विरोधकांत अस्वस्थता – शेवटच्या टप्प्यात ‘गेम चेंजर’ चाल?

शांत मोहिमेमुळे विरोधकांचे अनेक हिशोब चुकले आहेत. अखेरच्या टप्प्यात जेठवानी गटाकडून अपेक्षे पेक्षा धारदार पावलं उचलली जातील, असा एक मोठा सस्पेन्स सर्वत्र छाया आहे. त्यामुळे विरोधकांच्या कॅम्पमध्ये चांगलीच धाकधूक निर्माण झाली आहे.


प्रभाग ९ मध्ये एकच चर्चा — ‘निवडणुकीचं चित्र बदलणार कोण?’

मतदारांमध्ये चर्चा तापली आहे.
एकीकडे गुप्त आणि ठोस प्रचार करणारा भारत जेठवानी,
तर दुसरीकडे परिस्थिती उलटणार या भीतीने त्रस्त विरोधक.

या सर्व घडामोडींमुळे प्रभाग ९ हा या निवडणुकीतील सर्वात ‘सस्पेन्सफुल’ प्रभाग ठरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!