Join WhatsApp group

प्रभाग क्रमांक १० : सिद्धार्थ नगरमध्ये दारू–मटन पार्ट्यांचा महापूर; महिलांना शौचालयासाठी अजूनही रेल्वे परिसराची वाटचाल वर्षानुवर्षे विकास ठप्प, अमिषांचे राजकारण ठरते प्रभावी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर │ प्रभाग क्रमांक १० मधील सिद्धार्थ नगर परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा अमिषाधारित राजकारण तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. मटन–चिकन भोजन, दारू पार्ट्या, रोख स्वरूपातील मदत यांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा उघडपणे प्रयत्न सुरू असताना, या भागातील मूलभूत सुविधा मात्र वर्षानुवर्षे जागेवरच ठप्प आहेत.

या परिसरात आजतागायत एकही सार्वजनिक शौचालय उभारले गेले नाही, त्यामुळे महिलांना, तरुणींना आणि शाळकरी मुलींना दररोज पहाटे व संध्याकाळी रेल्वे परिसरात जाऊन शौच करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक परिस्थितीत महिलांना जाण्याची वेळ येत असून, यावर कोणत्याही पक्षाने किंवा निवडून आलेल्या सदस्यांनी ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही.

स्थानिक महिलांनी व्यक्त केलेली नाराजीही गंभीर आहे.

“निवडणुकीच्या काळात मटन, दारू वाटण्यासाठी पैसा असतो; पण आमच्यासाठी शौचालय बांधायला वेळही नाही, इच्छा तर दूरच राहिली,” असे एका ज्येष्ठ महिला रहिवाशींनी सांगितले.

परिसरातील युवकांचे म्हणणेही तितकेच तीव्र आहे. आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने आणि अशिक्षित मतदारांची संख्या अधिक असल्याने अमिषांचा मारा अधिक प्रमाणात होतो, असा त्यांचा आरोप आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या दारू–मटन पार्ट्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.

या भागात

  • नाले–गटार दुरुस्ती,
  • पिण्याच्या पाण्याची समस्या,
  • महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक सुविधा
    या सर्व मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत.

परंतु प्रत्येक निवडणुकीत अमिषांवर आधारित प्रचारच प्रभावी ठरत असून, विकासाचे राजकारण मागे पडत आहे, अशी व्यापक भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

सिद्धार्थ नगर परिसरातील वस्तस्थिती पाहता प्रशासन व निवडणूक उमेदवारांनी मूलभूत सुविधा प्राधान्याने सोडवून अमिषमुक्त शाश्वत विकास मॉडेल उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!