Join WhatsApp group

जिल्हा मधिल दिग्गज नेत्यांची कुरणखेड जिल्हा परिषद सर्कल वर उमेदवारी साठी नजर.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

कुरणखेड- दिनांक १५ ऑक्टोबर –

नुकताच जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे आणि यामध्ये आरक्षण जाहीर झाला आहे कुरणखेड मतदारसंघ ओबीसी राखीव निघाल्याने जिल्ह्यामधील अनेक दिग्गजांची या मतदारसंघाकडे नजर लागली आहे.

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या कुरणखेड सर्कल हा माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे विद्यमान खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर यांचा मतदारसंघ असून हा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षांपासून वंचितचा उमेदवार या मतदारसंघातून निवडून येत आहे.

आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये कुरणखेड जिल्हा परिषद मतदार संघ हा ओबीसी राखीव निघाल्याने या मतदारसंघावर जिल्ह्यातील अनेक राजकीय पक्षाच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांची नजर ठेवून बसले आहे,

त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद वर सर्वच पक्षावर पार्सल उमेदवार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे काही वर्षा अगोदर झालेल्या पोट निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून सर्वसाधारण जागेमधून सुशांत बोर्डे हे निवडून आले होते त्यांनी भाजपचे कमलाकर गावंडे यांचा थोड्या मतांनी पराभव केला होता यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा चांगले मताचे गणित जोडले होते.

त्यामुळे ती निवडणूक रंगतदार ठरली जवळपास 18000 मतदार असलेल्या या मतदारसंघात सर्वच जाती-धर्माचे मतदार या मतदारसंघात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस ओबीसी राखीव निघाल्याने धनगर समाजाला संधी देणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

त्याचबरोबर भाजपकडे स्थानिक उमेदवाराबरोबर पार्सल उमेदवारही सध्या चर्चेत आहे त्याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सुद्धा उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

वंचित साठी हा गड मांनला जातो मात्र या गडाला यावेळेस कोण सुरूंग लाऊ शकणार का याकडे आता सर्व मतदार संघाचे यांचे लक्ष लागले आहे.

∆ भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवारभाजपा माजी पंचायत समिती सदस्य पती, भाजपा कुरणखेड मंडळ अध्यक्ष प्रशांत ठाकरे, आमदार हरीश पिंपळे यांचे निकटवर्तीय मानले जात आहे त्याबरोबर संघाचे स्वयंसेवक आहेत, पळसो बढे ग्रामपंचायत माजी सरपंच, भाजपा अकोला तालुका सरचिटणीस, आत्मा समिती अध्यक्ष अकोला जयकृष्ण ठोकड, हे दोघेही स्थानिक उमेदवार असून यांचं मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे त्याचबरोबर या मतदारसंघात भाजप पार्सल सुद्धा उमेदवार उतरू शकते.

∆ वंचित बहुजन आघाडी इच्छुक उमेदवारा माजी जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, माजी जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, पंचायत समिती माजी सभापती मोहन उर्फ वसंतराव नागे, धनगर समाजाच युवा नेतृत्व सुमित नवलकर, हे वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार मानले जात आहे.

∆ शिवसेना उद्धव सेना काँग्रेस राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून शिवा मोहोड यांची सध्या कुरणखेड मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चा बांधणी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे शिवा मोहोड यांच्या इछुक उमेदवारी ने मतदारसंघात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

बातमी – योगेश विजयकर


Share

Leave a Comment

error: Content is protected !!