Join WhatsApp group

अवकाळी पावसाने डाबकी रोडवरील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी – दुकानदारांचे लाखोंचे नुकसान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला दि.२५. आज दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने डाबकी रोडवर असलेल्या बेसमेंट मधील दुकानांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहून सांगितले.
अकोला शहरातील डाबकी रोडवर रुंदीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी महानगरपालिकेने एका बाजूने नाल्या तर दुसऱ्या बाजूने पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे नियोजन केले आहे. हे काम खरं तर पावसाळा पूर्वीच पूर्ण व्हायला हवे होते मात्र पावसाळा सुरू होण्याचा काळ जवळ आला आणि अवकाळी पावसाने धूम केल्यामुळे, निर्माणाधिन असलेल्या नाल्यांमध्ये पाणी भरून गेल्याने, ते पाणी अखेर बेसमेंट मधील दुकानांमध्ये शिरले असून व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले.

पावसाच्या पाण्याने निर्माणाधिन असलेल्या नाल्यांमध्ये पाणी भरून ते अखेर दुकानांच्या बेसमेंट मध्ये शिरल्याचे दिसत आहे. डाबकी रोडवरील मुरली हॉटेलच्या बाजूला असलेल्या सरस्वती प्रोविजनच्या बेसमेंट मधील गोडाऊन मध्ये कमरेपर्यंत पाणी साचल्याने किराणा मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने महानगरपालिकेने कार्यवाही करून डाबकी रोडवरील व्यापाऱ्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी जोर धरत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!