Join WhatsApp group

मृत जनावरांच्या हाडांची विनापरवाना वाहतूक – दोघांवर गुन्हा मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (प्रतिनिधी) – रसुलपूर फाटा येथे पोलिसांनी कारवाई करून विनापरवाना मृत जनावरांची हाडे, शिंगे व खुर भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली.

या प्रकरणात एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पीकअप (क्र. MH-27-X-2731) व मुद्देमाल असा एकूण 2 लाख 68 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना 11 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता उघडकीस आली. नाईट पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना बोलेरो पिकअपमधून दुर्गंधीयुक्त वास आल्याने संशय आला.

वाहन अडवून तपासणी केली असता मृत जनावरांची हाडे, शिंगे व खुर आढळून आले. आरोपींकडे वाहतुकीचा परवाना वा खरेदी पावती नव्हती.

सदर माल मानवी आरोग्यास व जीवितास धोकादायक असल्याची जाणीव असूनही आरोपींनी तो वाहतूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी सैय्यद जावेद सैय्यद सादीक (वय 31, रा. अंबोडा, ता. अकोट) व मोहम्मद आकीब मोहम्मद आरिफ (वय 29, रा. अंबोळी वेस, अकोट) यांच्यावर अप क्रमांक 259/25 कलम 281, 271, 223(ब) भा.न्या.सं. सहकलम 104 मोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.का. प्रमोद नवलकर हे करीत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!