Join WhatsApp group

१ क्विंटल गोमांसासह दोन आरोपींना अटक – पण कोणाच्या भरोशावर गोवंशाची कत्तल करणारे प्रशासनालाच खुले आव्हान देत आहेत?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : अकोला जिल्ह्यात गोमांस तस्करीचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. खदाण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कौलखेड परिसरात बार्शीटाकळीहून अकोल्याकडे येणाऱ्या ऍपे वाहनावर (MH-30 P-9358) छापा टाकून कारवाई केली.

तपासणीत वाहनातून २५ हजार रुपयांचे १ क्विंटल गाईचे मांस आढळले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गोवंश संरक्षण अधिनियमासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींकडून एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अति. पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. मनोज केदारे यांच्या नेतृत्वात संजय वानखडे, नितीन मगर आणि रोहित पवार यांनी केली.

या घटनेवरून स्पष्ट होते की, जिल्ह्यात अजूनही बिनधास्तपणे कत्तलखाने सुरू आहेत. प्रशासनाचा धाक नसल्याने गोमांस तस्करीचा उद्योग वाढत चालल्याचे दिसून येते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!