Join WhatsApp group

सोयाबीन चोरी प्रकरणात दोन आरोपी अटकेत – अकोला एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (दि. 25 सप्टेंबर) – एमआयडीसी पोलिसांनी सोयाबीन चोरीच्या गंभीर प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना अटक करून तब्बल ₹1,31,839/- किमतीचे 49 पोते सोयाबीन जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज छगन व्यास यांच्या वखार महामंडळ, एमआयडीसी क्र. 4, अकोला येथील गोडाऊनमधून दिनांक 02 ऑगस्ट 2025 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून सोयाबीनचे पोते चोरी केली होती.

सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख फैजान शेख जामीन (रा. फिरदोस कॉलनी, अकोला) व इम्रान खान अयाज खान (रा. नया बैदपुरा, अकोला) या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व 49 पोते सोयाबीन जप्त करण्यात आले.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि राहुल जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात पोहेकाॅ विजय अंभोरे, पोकाॅ भूषण सोळंके व भगवान आकमार यांचा समावेश होता.

👉 अकोल्यातील या कारवाईमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!