Join WhatsApp group

ऑटो रिक्षांची तोडफोड करणाऱ्या दोन आरोपींना अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला | रामदासपेठ

रामदास पेठ परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षांची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून सुमारे ₹४,००० चे नुकसान केल्याच्या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

घटनेचा तपशील :

८ जुलै रोजी सायंकाळी ८.३० वाजता रेवणकुमार रामभाऊ गायकवाड (वय ६०) यांनी त्यांचा ऑटो (MH 30 AA 6652) घरासमोर उभा केला होता. त्याच ठिकाणी नरेंद्र बाळाभाऊ रणपीस यांनी त्यांची ई-रिक्षा उभी केली होती. रात्री २.३० च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दोन्ही रिक्षांच्या काचा फोडून तोडफोड केली.

पोलिस तपास व अटक :

या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिरीष खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक सक्रिय झाले. गुप्त माहितीनंतर पोलिसांनी मालापुरा येथील ओम सुरेश खरे (२०) व ललित रमेश बनसोद (१९) या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!