Join WhatsApp group

ताथोड व्यापाऱ्याचा ट्रक ताब्यात; रेशन तांदळाचा काळाबाजार उघडकीस येणार का? अहवाल येण्याची आज शक्यता.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर :२ जुलै २५: गुप्त माहितीच्या आधारे २८ जून रोजी शहर पोलिसांनी बाळापुर तालुक्यातील ताथोड नावाच्या व्यापाऱ्याचा तांदळाने भरलेला ट्रक ताब्यात घेतला.

सदर ट्रक पोलिस स्टेशनमध्ये उभा करण्यात आला असून, हा तांदूळ रेशन माफियाचा की वैध व्यापारासाठी असलेला आहे, याची चौकशी सुरू आहे.

यासंदर्भात मुर्तिजापूर पुरवठा विभागाला कळविण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हा तांदूळ बाळापुर तालुक्यातील एका राजकीय आश्रय असलेल्या रेशन माफियाचा असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणावर रेशनचा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले असून, हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे.आज मुर्तिजापूर पोलीस स्टेशनला माननीय तहसीलदार आणि पुरवठा विभागाकडून अहवाल सादर करण्यात येणार आहे.

तहसीलदार शिल्पा बोबडे मॅडम यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, काळाबाजार करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही.हा ट्रक सोडण्यात येतो की त्यावर गुन्हा दाखल केला जातो, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. प्रशासनाची भूमिका आणि पुरवठा विभागाचा अहवाल या प्रकरणात निर्णायक ठरणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!