Join WhatsApp group

सैनिकांच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचे मुर्तीजापुर शहरात आयोजन 

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १८ _ मुर्तीजापुर – जम्मू – काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलच धडा शिकवला..त्यामुळे भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आज मुर्तीजापुर शहरात भाजपच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.जम्मू – काश्मीर मधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रतिउत्तर दिलयं..ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केली होती.या शिवाय पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली..त्यामुळे भारतीय सैनिकांच्या या कामगिरीचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे.

याच अनुषंगाने आज मुर्तीजापुर शहरात भाजपाच्या पुढाकारातून आमदार हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीच आयोजन करण्यात आली होती . आमदार हरीश पिंपळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि सेवा निवृत्त भारतीय सैनिक व मुर्तीजापुरकर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याच पहायला मिळालं.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!