Join WhatsApp group

आज होणार उमेदवारी अर्ज मागे आणि घडणार मोठा अर्थ कारण ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – ४ नोव्हेंबर २४ – मुर्तीजापुर बर्शिटाकली मतदार संघात एकूण २९ उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगा कडे दाखल करण्यात आले आहे. निवडणूक आयोगा कळून आज अर्ज मागे घेण्याची अतिंम तारीख जाहीर करण्यात आली आहे, दुपारी ३ ते ४ वा. पर्यंत कोण कोण आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार हे चित्र स्पष्ट होईल.

लोकशाही असल्यामुळे कोणी पण निवडणूक लढू शकतो पण त्याला सुद्धा अटी आहेत.

२९ उमेदवारा मध्ये जास्त गर्दी त्यांची आहे, ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामधील काही इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करून पक्षाचा लक्ष आपल्या कडे ओळतात, तर काही आपली पावर दाखवण्यासाठी, भविष्यात आपल्याला पक्षा कडून किवा उमेदवार काही तरी फायदा करून घेऊ या साठी अर्ज भारतात. काही तर राजकारणाला आपला धंदा बनवला असून निवडणुकीचा वेळी अर्ज भरून परत घेण्याचा त्यांचा धंदा असतो.

जर काही अर्ज मागे नाही झाले तर याचा फटका महाविकास आघाडी, महायुती, व वंचितला बसण्याची शक्यता आहे.

तरी या उमेदवारांनी साम,दाम, दंड, भेद या सूत्राचा वापर २९ ऑक्टोबर नंतर सुरु केल्याचा समजते, या मध्ये मोठ्या प्रमाणावर अर्थ कारण पण जुडले आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. आज २९ अर्जा मधून किती अर्ज परत घेतले जातात ते आज समजेल.

जे अर्ज मागे घेण्यात येणार त्यांनचा वर कोणता राजकीय दबाव तर नाही ना ? काही छुप्या पद्धतीने अर्थ कारण तर झाले नाही ना? किंवा भविष्यात यांना काही पक्ष कडून मोठा आमिष तर दिला गेला नाही ना ? काही ला या धंध्या मध्ये कमी वेळेत जास्त नफा तर होईल ना ? पक्षात आपली किंमत वाढवण्यासाठी तर हा सोंग नाही ना? कोणी कोणाला पाडण्या साठी तर निवडणुकीत उभा नाही ना?

आता ३ या २९ मधून किती वजा करू शकतात आणि राजकारणाचा गणीताचे उत्तर काय काढतात ? कि याला राजकारणी गणिताला अजून अवघड बनवितात हे आज संध्याकाळ पर्यंत समजेल .


Share

Leave a Comment

error: Content is protected !!